Big boss 18: पुढची तारीख पडली की या एकदा.. गुणरत्न सदावर्तेंनी तृप्ती डिमरीलाही दिलं 'डंके की चोट पे उत्तर..'
बिग बॉस घरात येताच सदावर्ते तुम्ही शांत का असं म्हणत राजकुमार राव याने गुणरत्न यांच्याकडे त्यांच्या खास स्टाईलची फर्माईश केली.
Big Boss 18: बिग बॉसच्या 18 व्या पर्वातील पहिला आठवडा प्रेक्षकांच्या पसंतीस चांगलाच उतरला असून नुकतेच रविवारच्या भागात 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटाची स्टार कास्ट बिग बॉसच्या घरात आली होती. बिग बॉसच्या घरात आल्यापासून गुणरत्न सदावर्तेंच्या (gunaratna sadavarte) विशेष शैलीचं, विनोदी हावभाव करत डायलॉगबाजीचं मोठं कौतुक होताना दिसत आहे. सदावर्तेंचा घरातील वावर प्रेक्षकांच्या पसंतीसही पडत असल्याचं दिसतय.
दरम्यान, रविवारच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सलमान खान ही सदावर्तेंना तुम्ही जे बोलता ते करता.. असं म्हटलंय. शिवाय राजकुमार राव आणि तृप्ती डीमरी यांनाही गुणरत्न सदावर्तेंच्या स्टाईलवर हसण्यास भाग पाडले. सदावर्तेंची स्टाईल पाहून अभिनेत्री तृप्ती डीमरीने सदावर्त्यांना एक सवालही केला. त्यावर डंके की चोट पे उत्तर देत त्यांनी पुन्हा एकदा सर्वांनाच हसवले.
राजकुमार रावनं केली सदावर्तेंच्या स्टाईलची फर्माईश
बिग बॉस घरात येताच सदावर्ते तुम्ही शांत का असं म्हणत राजकुमार राव याने गुणरत्न यांच्याकडे त्यांच्या खास स्टाईलची फर्माईश केली. त्यावर हमारे स्टाईल से कराची वाला भी डरता है.. सरकार विपक्ष ही आमच्या हसण्यावर फिदा आहे.. असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी जोरात हसत सगळ्यांनाच हसवले. यावर पुढे हे हसू पाहण्यासाठी सिनेमामध्ये नाही तर जेल ची यात्रा करावी लागते... क्यूकी हम डाकू के खानदान से... असं गुणरत्न म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते यांच्या स्टाईलवर तृप्तीचा सवाल
गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या त्यांच्या स्टाईलवर तृप्ती डिमरी हिने गुणरत्न यांना सवाल केला. ती म्हणाली तुम्ही कोर्टातही असेच बोलता का? त्यावर डंके की चोट पे उत्तर देत ही तर माझी स्टाईल आहे.. यायचं असेल तर कोर्टाच्या पुढच्या तारखेला येऊन माझी ही भूमिका येऊन बघा.. असं सदावर्ते म्हणालेत. डंके की चोट पे भरोसा रखो इस काले कोट पे... असं म्हणत त्यांनी तृप्ती डिंमरीला उत्तर देत सर्वांच्या टाळ्या मिळवल्या.