दिशा-टायगर पुन्हा एकत्र दिसले..
टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी हे आज बॉलिवूडमधलं हॉट कपल आहे. या दोघामधली मैत्री ही आता नवी राहिलेली नाही.
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेकदा सिनेमे करता करता काही जोड्या जुळतात. काही जोड्या लोकांना एकत्र पाहायला आवडतात. त्यातलीच एक जोडी आहे टायगर आणि दिशा पटनीची. गेल्या काही वर्षापासून या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से बॉलिवू़डमध्ये चर्चेत होते. अर्थात लॉकडाऊन काळात या बातम्या फारशा आल्या नाहीत. कारण, लॉकडाऊनमध्ये दिशा आणि टायगर फारसे कुठे दिसले नव्हते. पण आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसली आहे.
टायगर श्रॉफ आणि दिशा पटनी हे आज बॉलिवूडमधलं हॉट कपल आहे. या दोघामधली मैत्री ही आता नवी राहिलेली नाही. त्याचीच पुष्टी आता मिळाली आहे. दिशा आणि टायगर मुंबईतल्या जुहूमध्ये एका हॉटेलात जेवायला आले होते. त्यावेळचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात टायगर श्रॉफने स्लीवलेस स्वेटजॅकेट आणि जीन्स परिधान केली आहे. तर दिशा पटनीने क्रॉप टॉप आणि जीन्स परिधान केली आहे. हे दोघेही या हॉटेलात जेवायला आले काही वेळ त्यांनी इथे एकत्र घालवला आणि मग त्यांनी तिथे उपस्थित चाहत्यांना फोटोही दिला. कोरोना काळात घ्यायची सगळी काळजी या दोघांनी घेतली होती. यांनी मास्कही परिधान केली होती.
दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ हे आपल्या नात्याबद्दल उघड बोलत नसले तरी हे दोघे बऱ्याचदा एकत्र असतात. अनेकदा ते हॉटेलात जेवायला जाताना दिसतात. भारत या सिनेमाच्या पोस्टर लॉंचलाही टायगर दिशासोबत आला होता. इतकंच नव्हे, तर दोघे एकाच डान्स क्लासला जात होते. कित्येकदा टायगरच्या बर्थ डे पार्टीला दिशा त्याच्यासोबत जात असे. त्यामुळे दिशा आणि टायगर यांच्यात काहीतरी नातं आहे हे सगळ्यांनाच माहीती आहे. कित्येकदा दिशा टायगर आणि त्याच्या आईसोबत जेवायला गेली आहे. असं असताना आता लॉकडाऊनंतर पुन्हा एकदा ही जोडी दिसली आहे. दिशा आणि टायगरच्या एकत्र दिसण्यान पुन्हा एकदा कपल्सवाल्या चर्चांना उधाण आलं आहे.