Marathi Movie : 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला,आनंद पिंपळकर दिसणार कृष्णशास्त्री पंडितांच्या भूमिकेत
Dharmakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji : 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' सिनेमात आनंद पिंपळकर कृष्णशास्त्री पंडित यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Dharmakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Marathi Movie : सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद आनंद पिंपळकर यांनी आजवर वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन केले आहे. आता ते एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांच्या मनोरंजासाठी सज्ज झाले आहेत. 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' (Dharmakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji ) या आगामी मराठी चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका ते साकारणार आहेत.
धर्मरक्षणासाठी ज्यांनी आपली आहुती दिली त्या अनेक अनामिक व्यक्तींपैकी एक जंजिऱ्याचे हनुमान भक्त आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पाईक कृष्णशास्त्री पंडित. या कृष्णशास्त्री पंडिताच्या दमदार भूमिकेमध्ये आपल्याला आनंद पिंपळकर दिसणार आहेत.
'या' दिवशी येणार सिनेमा भेटीला
यात अमृता खानविलकर आणि ठाकूर अनुप सिंग यांच्या समवेत अभिनयाची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील प्रस्तुत, तुषार शेलार दिग्दर्शित हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच या सिनेमात आणखी कोणते कलाकार झळकणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
'खूप समाधान आहे...'
आपल्या भूमिकेविषयी बोलताना आनंद पिंपळकर यांनी म्हटलं की, ‘आजवर बऱ्याच भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ चित्रपटातील कृष्णशास्त्री पंडित ही भूमिका माझ्यासाठी विशेष आहे. पराक्रमाच्या जोरावर अल्पकाळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव करणाऱ्या या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणाऱ्या ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या चित्रपटातल्या एका महत्त्वपूर्ण भूमिकेचा भाग होता आल्याचं खूप समाधान आहे. वेगळेपण आणि विशेष लकबी आत्मसात करून ही भूमिका मी साकारली आहे, प्रेक्षकांना ती नक्की आवडेल अशी आशा आहे.
View this post on Instagram