एक्स्प्लोर

Vidhan Sabha Election 2024 : 'आदित्य ठाकरेंविरोधात मला उमेदवारी द्या, मला वरळीच्या प्रश्नांची जाण', एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील मराठी अभिनेत्याचा दावा!

Vidhan Sabha Election 2024 : वरळी विधानसभेसाठी अभिनेता सुशांत शेलार इच्छुक असून आदित्य ठाकरेंच्या विरोधात आता पक्ष संधी देणार का याकडे लक्ष लागून राहिलं आहे.

Sushant Shelar : अभिनेता सुशांत शेलार (Sushant Shelar) हा मागील अनेक महिन्यांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसनेमध्ये सक्रिय आहे. त्यातच आता सुशांतने विधानसभा निवडणुकांसाठी रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्याविरोधात सुशांत निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीमध्ये आहे. सुशांतने वरळी विधानसभा मतदारसंघावर दावा एबीपी माझासोबत बोलताना केला आहे. 

सुशांत शेलार हा अनेक महिन्यांपासून वरळी विधानसभा मतदारसंघात बराच सक्रिय असल्याचं चित्र आहे. राम मंदिरानंतर जल्लोष,गणपती,नवरात्र अशा अनेक सणांमध्ये सुशांतने बरेच कार्यक्रम वरळीत राबवले. त्यामुळे जर सुशांतला शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याकडे लक्ष लागून राहिलं आहे. त्याचप्रमाणे वरळी मनसेकडून संदीप देशपांडेही रिंगणात आहेत. 

वरळीतल्या प्रश्नांची मला जाण - सुशांत शेलार

सुशांतने एबीपी माझासोबत बोलताना म्हटलं की, मी वरळीचा एक सामान्य नागरिक आहे. कमला मिलमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य कामगाराचा मी नातू आहे, टेलिकॉम कंपनीमध्ये काम करणाऱ्या सामान्य कामगाराचा मी मुलगा आहे. चाळीतल्या घरात लहानाचा मोठा होत मी माझ्या अभिनयाचा प्रवास सुरु केला.तसाच बालशिवसैनिक म्हणूनही माझा प्रवास सुरु झाला. त्यामुळे जनसामान्यांच्या मूलभूत प्रश्नांची मला जाण आहे. इथल्या आमदारांनी पाच वर्षात ते सोडवले नाहीत म्हणून निवडणूक लढवायची आहे.

आदित्य ठाकरेंच्या विरोधात पक्ष संधी देणार?

आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचं नेतृत्व करत आहेत. पण शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर इतरांप्रमाणेच सुशांतनेही शिंदे गटाची साथ दिली. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघावरही तो दावा करत आहे. शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकांसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये वरळी विधानसभेसाठी अद्याप तरी उमेदवार देण्यात आलेला नाही. त्यामुळे वरळीतून शिंदे गटही सुशांतला संधी देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मनसेकडून संदीप देशपांडेही रिंगणात 

दरम्यान वरळी मतदारसंघातून राज ठाकरेंच्या पक्षाने संदीप देशपांडेंना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळे जर सुशांतही उमेदवारी दिली तर आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे आणि सुशांत शेलार ही तिहेरी लढत वरळी विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळेल. पण वरळीकर त्यांचा कौल कुणाच्या बाजूने देणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

ही बातमी वाचा : 

काळवीटाची शिकार नाही, 'या' कारणासाठी सलमानला मिळतायत जीवे मारण्याच्या धमक्या; लॉरेन्स बिश्नोईचा पोलिसांकडे मोठा खुलासा

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Embed widget