अजय देवगणचा 'पुन्हा धमाल'! चौथ्या भागाची रिलीज डेट जाहीर; निर्मात्यानं दिली मोठी हिंट
Dhamaal 4 to Hit Theatres on June 12: धमाल फ्रँचायझीचा चौथा भाग 'धमाल 4' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dhamaal 4 to Hit Theatres on June 12: अभिनेता अजय देवगण त्याच्या हिट चित्रपटाच्या सिक्वेलसह प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तो लवकरच धमाल फ्रँचायझीच्या चौथ्या भागासह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे. धमाल या चित्रपटाच्या चौथ्या भागात रितेश देशमुख, तुषार कपूर आणि अर्शद वारसी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, चाहते आधीपासूनच 'धमाल 4' बद्दल खूप उत्सुक आहेत. या सगळ्यात निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट निश्चित केली आहे. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होईल? जाणून घेऊयात.
धमाल 4 कधी प्रदर्शित होणार?
मॅडनेस आणि पोट धरून हसवण्यासाठी धमाल चित्रपटाची टीम पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. धमाल चित्रपटाचा लवकरच चौथा भाग प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. धमाल 4 हा कॉमेडी चित्रपट 12 जून 2026 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित या चित्रपटात मूळ कलाकारांचे पुनरागमन दिसून येत आहे. तसेच काही नवीन कलाकारांचेही समावेश आहे.
धमाल 4 चित्रपटाची स्टार कास्ट
धमाल 4 या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, संजय मिश्रा, जावेद जाफरी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन या कलाकारांचाही समावेश आहे. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहत्यांनी उत्सुकता दर्शवली. या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
धमाल चित्रपटाची वर्ल्डवाइड कमाई
धमाल चित्रपट सिनेमागृहात प्रचंड गाजला. 2007 साली धमाल हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने वर्ल्डवाइड अंदाजे 51.3 कोटींची कमाई केली. नॉन स्टॉप कॉमेडीमुळे हा चित्रपट प्रचंड गाजला. त्याचा सिक्वेल डबल धमाल 2011 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने वर्ल्डवाइड 71 कोटी रूपयांची कमाई केली. तर, या चित्रपटाचा तिसरा पार्ट टोटल धमाल हा चित्रपट 2019 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. या चित्रपटात अजय देवगण, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि रितेश देशमुख यांनी मुख्य भूमिका साकारली. हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटाने जगभरात अंदाजे 232.18 कोटींची कमाई केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या
'भाऊचा धक्का', तन्वी की रूचिता? रितेश देशमुखनं नेमकं कुणाला झापलं? PROMO सोशल मीडियात व्हायरल
























