Dara Singh : 200 किलोच्या किंग काँगला चारली धूळ; जाणून घ्या अभिनेते दारा सिंह यांच्याबद्दल
Dara Singh : 200 किलो वजन असलेल्या किंग काँगचा पराभव करणाऱ्या दारा सिंह यांनी 10 वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली.
Dara Singh : दारा सिंह (Dara Singh) यांची आज 10 वा स्मृतीदिन आहे. दारा सिंह हे कुस्तीपटू होते. त्यांनी एकही कुस्तीचा सामना हरला नव्हता. त्यांनी अनेक पैलवानांना हरवले होते. दारा सिंह यांनी कुस्तीपटू असताना अभिनयात देखील काम केलं. 200 किलो वजन असलेल्या किंग काँगचा पराभव करणाऱ्या दारा सिंह यांनी 10 वेळा वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप जिंकली. त्यांनी कॉमलवेल्थ, वर्ल्ड रेसलिंग, चँपियन ऑफ मलेशिया हे विजेते पद देखील पटकावले.
500 रेसलिंग मॅचमधील एकही मॅच हरले नाही
जवळपास 500 रेसलिंग मॅच खेळणारे दारा सिंह यांनी एकही मॅच हरले नव्हते. 1996 मध्ये हॉल ऑफ फेम आणि 2018 मध्ये WWE हॉल ऑफ फेम दारा सिंह यांना मिळाले. 1983 मध्ये दारा सिंग यांनी कुस्तीतून निवृत्ती घेतली. 1952 मध्ये आलेल्या 'संगदिल' चित्रपटातून दारा सिंह यांनी अभिनात एन्ट्री घेतली. दारा सिंह हे काही वर्षे चित्रपटांमध्ये स्टंट करत होते होता, पण त्यांना 1962 मध्ये आलेल्या बाबूभाई मिस्त्री यांच्या किंग काँग चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली. या चित्रपटाला त्यावेळी बी ग्रेड कॅटगिरी मिळाली होती. दारा सिंह आणि मुमताजच्या जोडीने एकूण 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. हे सर्व चित्रपट बी ग्रेड होते आणि या चित्रपटासाठी दारा सिंह यांना चार लाख रुपये मानधन मिळत होते.
1980 मध्ये रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमध्ये दारा सिंह यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. आनंद या चित्रपटात दारा राजेश खन्ना यांच्या कुस्ती गुरूची भूमिका दारा सिंह यांनी साकारली. जब वी मेट या चित्रपटात देखील दारा सिंह यांनी काम केलं. दारा सिंह यांनी दोन लग्न केली. त्यांना सहा मुलं आहेत. अपना पंजाब हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाची त्यांनी निर्मिती देखील केली होती.
दारा सिंह हे राज्यसभेमध्ये निवडून आलेला पहिले खेळाडू ठरले. ते 2003 ते 2009 पर्यंत खासदार होते. 7 जुलै 2012 रोजी दारा सिंह यांनी ह्रदयविकाराचा झटका आला. उपचार घेत असताना असं लक्षात आलं की, दारा सिंह यांच्या मेंदूमध्ये ब्लड लिकेड झालं आहे. त्यानंतर 11 जुलै 2012 रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. 12 जुलै 2012 रोजी दारा सिंह यांचे निधन झाले.
हेही वाचा: