एक्स्प्लोर

Daniel Balaji Death :  दाक्षिणात्य अभिनेत्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Daniel Balaji Death : तमिळ आणि मल्याळम चित्रपट अभिनेता डॅनियल बालाजीचे वयाच्या 48 व्या वर्षी निधन झाले आहे. डॅनियल बालाजीला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

Daniel Balaji Death :  दाक्षिणात्य सिनेसृष्टीतला (South Industry) सुप्रसिद्ध कलाकार डॅनियल बालाजीचे (Daniel Balaji) वयाच्या 48 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटकाने निधन झाले आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत शोककळा सध्या पसरली आहे. नुकतेच दक्षिणेतील लोकप्रिय कॉमेडियन लक्ष्मीनारायण शेषू यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.चित्रपटसृष्टी अजून या धक्क्यातून सावरली नव्हती की आता डॅनियल बालाजीच्या आकस्मिक निधनाने मोठा धक्का बसला आहे. 

डॅनियल बालाजीच्या छातीत दुखत होते. त्यानंतर त्याला 29 मार्च रोजी चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार देखील सुरु होते. पण सर्व प्रयत्न करण्यात आले पण डॅनियलचं निधन झालं. शुक्रवार 29 मार्च रोजी त्याने अखेरचा श्वास घेतला. डॅनियल बालाजीच्या आकस्मिक निधनाने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. डॅनियल बालाजीच्या पार्थिवावर 29 मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान दाक्षिणात्य सिनेसृष्टीतूनही डॅनियलच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

श्रीधर पिल्लई यांनी ट्वीट करत दिली माहिती

चित्रपट विश्लेषक श्रीधर पिल्लई यांनी ट्वीट करत डॅनियलच्या निधनाची बातमी दिली. त्यांनी लिहिले, '48 वर्षीय डॅनियल बालाजी, जो एक चांगला अभिनेता होता, रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.वेट्टय्याडू विलायाडू आणि पोल्लाधवन मधील त्याचा आवाज आणि अभिनय कोण विसरू शकेल?

डॅनियलच्या अभिनयाचा प्रवास

डॅनियलने ‘एप्रिल मधाथिल’ या तमिळ चित्रपटातून 2002 मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं. गौतम मेनन आणि सुर्या-ज्योतिका यांच्या ‘काखा काखा’ने चित्रपटामुळे त्याला विशेष प्रसिद्धी मिळाली. वेत्री मारनच्या ‘पोल्लाधवन’मध्येही खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. विजयच्या ‘बिगिल’ सिनेमांमध्ये काम केलं होतं. ‘आरियावन’ हा त्याचा शेवटचा सिनेमा होता.

ही बातमी वाचा : 

'देवीचा फोटो असलेला केक कापणार?' 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या सेलिब्रेशनवर प्रेक्षकांचा आक्षेप; झी मराठीकडून स्पष्टीकरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget