![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'देवीचा फोटो असलेला केक कापणार?' 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या सेलिब्रेशनवर प्रेक्षकांचा आक्षेप; झी मराठीकडून स्पष्टीकरण
Satvya Mulichi Satavi Mulgi : झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेचे नुकतेच 500 भाग पूर्ण झाले आहेत. पण सोशल मीडियावर प्रेक्षकांनी या मालिकेच्या सेलिब्रेशनवर आक्षेप घेतल्यचं पाहायला मिळालं.
!['देवीचा फोटो असलेला केक कापणार?' 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या सेलिब्रेशनवर प्रेक्षकांचा आक्षेप; झी मराठीकडून स्पष्टीकरण Satvya Mulichi Satavi Mulgi Zee Marathi Serial people are taking objection for Devi Picture on Cake Completed 500 episodes shared Photo on Social Media marathi Television Latest Update Marathi News 'देवीचा फोटो असलेला केक कापणार?' 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या सेलिब्रेशनवर प्रेक्षकांचा आक्षेप; झी मराठीकडून स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/455513e6f3b50b686ce1d45c7485f5a61711787857275720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Satvya Mulichi Satavi Mulgi : अनेक गोष्टींचं गुढ असलेली सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde) आणि अजिंक्य ननावरे (Ajinkya Nnaware) यांची मुख्य भूमिका या मालिकेत आहे. तसेच ऐश्वर्या नारकर, राहुल मेहंदळे, सुरुची अडारकर यांसारखी मंडळी देखील या मालिकेत पाहायला मिळतात. नुकतच या मालिकेने 500 भागांचा टप्पा पूर्ण केलाय. त्यानिमित्ताने मालिकेच्या सेटवर जोरदार सेलिब्रेशन देखील करण्यात आलं. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेत.
सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका रात्री 10.30 वाजता प्रक्षेपित केली जाते. त्रिनयना देवीचं मूळ गाभा या मालिकेचा आहे. नेत्राला असलेलं त्रिनयना देवीचं वरदान आणि त्याच्या जोरावर ती विरुचकावर करत असलेली मात या सगळ्यामुळे मालिकेला अनेक रंजक वळणं मिळाली आहे. पण याचमुळे नुकतच मालिकेच्या सेटवर करण्यात आलेल्या सेलिब्रेशनला प्रेक्षकांनी आक्षेप घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
नेमकं काय घडलं?
सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या सेटवर 500 भागांच सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी जो केक आणण्यात आला त्यावर त्रिनयना देवाची फोटो होती. मालिकेच्या सेटवरील सेलिब्रेशनचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. त्यावर कमेंट करत देवीचा फोटो असलेला केक कापणार का असा काहींनी प्रश्न विचारला. त्यावर झी मराठीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
वाहनीकडून स्पष्टीकरण
या फोटोंच्या सेलिब्रेशनवर वाहिनीकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. कमेंट करत झी मराठीने यावर स्पष्टीकरण दिलं. केकचा तो भाग बाजूला काढून ठेवला होता! त्रिनयना देवी या मालिकेचा मूळ गाभा आहे! हे रहस्य तिने योजलेलं आहे! त्यामुळे सगळ्या क्रीएटीव्ह वर तिची प्रतिमा असतेच, असं झी मराठीकडून सांगण्यात आलं आहे.
View this post on Instagram
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)