फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची चव चाखत सलमान खानने घेतला मदतकार्याचा आढावा
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, वैद्यकिय कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठई दररोज चहा, नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' या स्वयंसेवी संस्थेतर्फे मुंबईतील फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस, वैद्यकिय कर्मचारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसाठई दररोज चहा, नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे. सलमानची स्वयंसेवी संस्था आणि 'आय लव्ह मुंबई' नावाच्या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं मुंबईतील विविध भागांमध्ये जात Being Haangryy नामक फूड ट्रकच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जात आहे.
मुंबईतील 'भाईजान्स' नावाच्या एका हॉटेलमध्ये फ्रंटलाईन वर्कर्ससाठी देण्यात येणारा नाश्ता बनवला जातो. सर्वच स्तरांतून या मदकार्याची प्रशंसा होत असताना या संकटाच्या प्रसंगी खुद्द सलमान खान यानं फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या नाश्त्याची चव चाखत तो चांगल्या प्रतीचा असल्याची बाब निश्चित केली. यावेळी तो आपल्या वांद्रे येथील निवासस्थानाहून खाद्यपदार्थ तयार केले जात असणाऱ्या ठिकाणी पोहोचला.
आपला 'शिऱ्या' बनलाय कोविड वॉरिअर! कोविड काळात विकास कदम ऑन ड्युटी 24 तास...
स्वयंसेवी संस्थांच्या वतीनं राहुल कानन यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधत सलमाननं या ठिकाणी भेट दिल्याची माहिती देत सांगितलं, 'यावेळी सलमाननं नाश्ता तयार करणाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी नाश्त्यामध्ये 5 हजार वर्कर्ससाठी पाव भाजी बनवण्यात आली होती. खुद्द सलमाननंही इथं भाजीची चव चाखत आपल्याला चव आवडल्याचंही सांगितलं, आणि यात नेमकं काय भावलं ते भाजी तयार करणाऱ्यांना सांगितलं'.
पहिल्या लॉकडाऊनच्या काळात सलमानच्या 'बिइंग ह्यूमन फाउंडेशन' या संस्थेकडून जवळपास 2 लाख गरजवंतांना अन्नधान्य पुरवठा करण्यात आला होता. याशिवाय हजारो मजुरांना सलमाननं आर्थिक मदही देऊ केली होती. संकटाच्या या काळात अनेकजण मदतीचा हात देत असतानाच सलमानची ही मदत आणि खुद्द जाऊन मदकार्याचा आढावा घेणं सर्वांचीच मनं जिंकत आहे.
फक्त सलमान खानच नव्हे तर, मागील काळात अनेक सेलिब्रिटींनी पुढआकार घेत कोरोनाच्या या युद्धात त्यांच्या परिनं गरजूंना मदत करण्याचं सतत सुरु ठेवलं आहे. कलाविश्वात काम करणाऱ्या तंत्रज्ञांना मदत देणं असो किंवा मग आरोग्य सुविधा पुरवणं असो, नानापरिंनी या मंडळींनी मदतीचा हात दिल्याचं पाहायला मिळालं.