(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Laal Singh Chaddha : आमिर खानच्या 'लाल सिंह चड्ढा'वर बंदी घालण्याची मागणी, नेमकी कारणं तरी काय?
Laal Singh Chaddha Controversy : आमिर खानच्या या चित्रपटाला सातत्याने ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर लोक या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.
Laal Singh Chaddha Controversy : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटाला लोक भरभरून प्रतिसाद देत आहेत. एकीकडे लोक या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांना सलाम करत असताना, दुसरीकडे बॉलिवूडमध्ये आपल्या 'परफेक्शन'मुळे चर्चेत असलेला आमिर खान (Aamir Khan) आणि त्याचा आगामी चित्रपट 'लाल सिंग चड्ढा'ला (Laal Singh Chaddha) विरोध करत आहे. आमिर खान आणि त्याच्यासोबत या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री करीना कपूरलाही (Kareena Kapoor) या चित्रपटासाठी सातत्याने ट्रोल केले जात आहे. सोशल मीडियावर लोक या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करत आहेत.
नुकतीच आमिर खान याने ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली होती. आमिर खान म्हणाला होता की, प्रत्येक भारतीयाने काश्मीर फाइल्स हा चित्रपट पाहावा. त्याच्या या विधानामुळे तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आणि लोकांनी आमिरवर राग व्यक्त करण्यास सुरुवात केली. नेटकऱ्यांनी त्याला त्याच्या जुन्या गोष्टींची आठवण करून दिली आणि त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
'पीके' चित्रपटात 'हिंदू धर्मा'चे चुकीचे चित्रण केल्याबद्दल, 'शिव पिंडीवर दूध घालणे हे निरुपयोगी’ असे विधान केल्याबद्दल लोकांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय लोकांनी करीनालाही घेरले आणि एक व्हिडीओ शेअर केला, ज्यामध्ये ती 'नेपोटिझम'वर बोलत होती. अर्थात करीनाचे हे वक्तव्य जुने असले तरी त्यावरून ती आता ट्रोल होत आहे.
असहिष्णुतेवर आमिर खानचे वादग्रस्त विधान
नेटकऱ्यांनी आमिर खानला त्याच्या काही वर्षांपूर्वीच्या असहिष्णुता वक्तव्याची आठवण करून दिली. एका मुलाखतीदरम्यान आमिरने म्हटले होते की, त्यांची पत्नी किरण रावला देशात राहण्याची भीती वाटते. या विधानानंतर एकच खळबळ उडाली आणि त्याला चांगलेच ट्रोल करण्यात आले. लोकांना तो प्रसंग आठवला आणि आता ते त्याबद्दल ट्विट करत आहेत.
‘पीके’मध्ये हिंदू देवतांचा अपमान
2014 मध्ये आलेल्या 'पीके' चित्रपटावरही लोक संतापले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन इतक्या वर्षानंतरही एका दृश्याबद्दल लोकांच्या मनात राग आहे. याबाबतचे ट्विटही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये आमिर खानवर देवाची खिल्ली उडवल्याचा आरोप होत आहे.
शिवपिंडीवर दूध अर्पण करण्यावरून वाद
आमिर खान 'सत्यमेव जयते' हा शो होस्ट करायचा आणि एकदा या शोमध्ये तो म्हणाला होता की, ‘शिवाच्या मूर्तीवर 20 रुपयांचे दूध अर्पण करण्यापेक्षा एखाद्या गरजू मुलाला खायला दिले तर चांगले होईल.’ अनेक वर्षांनी हा मुद्दा उपस्थित करून लोक त्याला ट्रोल करत आहेत आणि म्हणत आहेत की 'लाल सिंग’ पाहण्यात पैसे गुंतवण्याऐवजी गरिबांना जेवण द्या.
तुर्की भेट वादात
आमिर 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटाच्या शूटिंगसाठी तुर्कीला गेला होता. यादरम्यान त्याने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी एमीन एर्दोआन यांचीही भेट घेतली. या भेटीनंतर आमिर वादात सापडला होता. त्यांचा फोटो समोर येताच लोकांनी त्याला खूप ट्रोल केले होते.
करीना कपूरही होतेय ट्रोल
आमिर खानसोबतच करीना कपूरही ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तिचाही एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो त्यावेळचा आहे, जेव्हा भारतात 'नेपोटिझम'ची चर्चा सुरू होती. यावर करीना म्हणाली होती की, ‘लोकच स्टार किड्सच्या मागे धावतात, काही वाटत असेल तर सिनेमाला जाऊ नका ना!’ आता लोक यावरूनच 'आम्ही लाल सिंह चढ्डा बघायला जाणार नाही' असे म्हणत आहेत. यासोबतच तिला तिच्या मुलांच्या नावावरूनही ट्रोल केले जात आहे. आता हे सगळेच वाद त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनात बाधा आणणारे ठरणार आहेत.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Dasvi Trailer: दसवीचा ट्रेलर पाहिल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले...
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha