Bharti Singh : भारतीच्या लेकाचं गंमतीशीर नाव! अर्थ सांगताना म्हणाली..
भारतीनं (Bharti Singh) तिच्या मुलाचं नाव काय ठेवलं आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
Bharti Singh : कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) तिच्या विनोदी शैलीनं नेहमी प्रेक्षकांची मनं जिंकते. भारती आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांच्या घरी काही दिवसांपूर्वी नव्या पाहुण्याचे आगमन झाले. त्यांना 3 एप्रिल रोजी पुत्रप्राप्ती झाली. त्यांचा मुलगा एक महिन्यांचा झाला आहे. भारतीनं तिच्या मुलाचं नाव काय ठेवलं आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात भारतीच्या मुलाच्या नावाबद्दल...
भारतीनं काही इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये हर्ष आणि त्याच्या मुलगा दिसत आहे. हा फोटो शेअर करुन भारतीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हॅप्पी वन मंथ गोला.' भारतीनं तिच्या मुलाचं नाव 'गोला' असं लिहिलं आहे. जेव्हा भारतीला मुलाचं नाव गोला ठेवण्यामागचे कारण विचारण्यात आले तेव्हा तिनं मजेशीर उत्तर दिलं. भारतीनं सांगितलं की तिचा मुलगा गोलू-मोलू आहे. त्यामुळे तिनं मुलाचं नाव गोला ठेवलं.
काय आहे नावाचा अर्थ
गोला या नावाचा अर्थ नदी असा होतो. मुलाला जन्म दिल्यानंतर 12 दिवसानंतर भारतीनं काम करण्यास सुरूवात केली. त्यानंतर अनेकांनी भारतीला ट्रोल केलं होतं. या ट्रोलर्सला भारतीनं सडेतोड उत्तर देखील दिलं होतं.
View this post on Instagram
हेही वाचा :