Panchayat Season 2 Trailer : 'पंचायत'च्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर रिलीज, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Panchayat : बहुचर्चित 'पंचायत'वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.

Panchayat Season 2 Trailer : बहुचर्चित 'पंचायत' (Panchayat) वेब सीरिजच्या दुसऱ्या सीझनचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. जुहू जवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये 'पंचायत'वेब सीरिजचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. 'पंचायत'चा दुसरा सीझन 20 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'पंचायत'च्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यामुळे प्रेक्षक दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ही वेब सीरिज ग्रामीण जीवनावर भाष्य करणारी आहे. 'पंचायत' सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा दीपक कुमारने सांभाळली आहे.
View this post on Instagram
'पंचायत' या सीरिजमध्ये अभिषेक मिश्रा या मुलाची कथा दाखवण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी जितेंद्र कुमारने 'गाव चले' असे कॅप्शन लिहित पंचायत वेब सीरिजचे पोस्टर शेअर केले होते. या सीरिजमध्ये जितेंद्र कुमार, रघुवीर यादव आणि नीना गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या






















