एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

शहीद मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या आयुष्यावर आधारित 'मेजर' सिनेमा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. 'मेजर' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये संदीप उन्नीकृष्णन यांच्या बालपणीपासून ते मेजरपर्यंतच्या अनेक आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. तसेच मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी दहशतवाद्यांचा कसा सामना केला याची झलक 'मेजर' सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.

पृथ्वीराजचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारच्या पृथ्वीराज या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमधील सेटनं तसेच कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे लक्ष वेधलं आहे. अक्षय कुमारनं या चित्रपटामध्ये पृथ्वीराज ही प्रमुख भूमिका साकारली असून या चित्रपटामध्ये मानुषी छिल्लरनं संयोगिता ही भूमिका साकारली आहे.

‘केजीएफ 2’ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट! 

'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस' हा हॉलिवूड चित्रपट रिलीज होऊनही, 'KGF: Chapter 2' हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. प्रशांत नील दिग्दर्शित आणि यश स्टारर चित्रपट आता 500 कोटींच्या अगदी जवळ पोहोचला आहे. लवकरच हा चित्रपट ‘बाहुबली 2’शी स्पर्धा करेल. या चित्रपटाने चांगला नफा मिळवला आणि KGF 2 हा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

अभिनेत्री माही विजने मुंबई पोलिसांकडे मागितली मदत

अभिनेता जय भानुशाली यांची पत्नी आणि अभिनेत्री माही विज हिने नुकताच एक व्हिडीओ शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे. या व्हिडीओत तिने स्वतःसोबत घडलेल्या एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला आहे. माहीने सांगितले की, भर रस्त्यात एका व्यक्तीने तिला शिवीगाळ केली. एवढेच नाही, तर गैरवर्तन करण्यासोबतच या व्यक्तीने तिला बलात्काराची धमकीही दिली आहे. माहीने याच घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत मुंबई पोलिसांकडे मदत मागितली आहे. 

सोनाली सोनावणेची पहिलीच लावणी ठरली हिट!

सोशल मीडियावर ट्रेंडीग सिंगर म्हणून प्रसिद्ध असणारी गोड गळ्याची गायिका सोनाली सोनावणे (Sonali Sonawane) हीच्या जादुई आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं आहे. ‘माझी बाय गो’, ‘मी नादखुळा’, ‘पिरतीचं गाव’, ‘पोरी तुझे नादानं’ अशी तिने गायलेली कित्येक गाणी बऱ्याच म्युझिक प्लॅटफॉर्मवर ट्रेंडीग आहेत. नुकतचं 'अहो शेठ लय दिसान झालीया भेट' या तिने गायलेल्या पहिल्याच लावणीने 10 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.

रॅपर बादशाहने खरेदी केली ऑडी Q8

तरुणाईंच्या लाडक्या रॅपर बादशाहने एक महागडी कार खरेदी केली आहे. बादशाहाने 'ऑडी Q8' ही कार खरेदी केली आहे. या कारची किंमत 1 कोटी 23 लाख रुपये आहे. बादशाहने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. 

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाने वाढदिवशी शेअर केले 'Liger' सिनेमाचे पोस्टर

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आज 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. विजयने वाढदिवसानिमित्त खास त्याच्या आगामी 'लायगर' सिनेमाचे पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. 

अजय गोगावलेच्या आवाजातील 'कान्हा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

सध्या सर्वत्र 'चंद्रमुखी'च्या घुंगरांचे बोल घुमत असून 'चंद्रमुखी' या चित्रपटाला प्रेक्षक, समीक्षक आणि सिनेसृष्टीमधून भरभरून प्रतिसाद मिळतं आहे. चंद्रालाही प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले, देत आहेत. चित्रपटातील भन्नाट गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर आता प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार 'कान्हा' हे गाणं आपल्या भेटीला आलं आहे. 

देशभरातील शाळांनी विद्यार्थ्यांना 'पृथ्वीराज' चित्रपट दाखवणं अनिवार्य करावं : अक्षय कुमार

सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या पृथ्वीराज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. मुंबईमधील यश राज स्टूडिओ येथे या चित्रपटाच्या ट्रेलरचा ट्रेलर लाँचचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अक्षय कुमार  , मानुषी छिल्लर आणि दिग्दर्शक  डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी हजेरी लावली होती. 

पन्हाळ्यामध्ये 'श्यामची आई' चित्रपटाचं शूटिंग सुरू

'श्यामची आई' (Shyamchi Aai) हा मराठी मनाचा एक हळवा कोपरा मानला जातो. साने गुरुजींनी आपल्या अंत:करणात वसलेली 'आई' कागदावर उतरवली. आज इतकी वर्षे होऊनही या आईची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता सिनेमाच्या रूपातून 'श्यामची आई' प्रेक्षकांना भेटणार असल्याचं सर्वांनाच माहित आहे. घोषणेपासूनच लाइमलाईटमध्ये आलेल्या या चित्रपटाचे शूटिंग सध्या वेगात सुरू आहे. कोकणातील पावसमध्ये पहिलं शेड्यूल यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर दिग्दर्शक सुजय डहाके आणि त्याची टीम पन्हाळा मुक्कामी पोहोचली आहे. सध्या या चित्रपटाचं शूटिंग पन्हाळा येथे सुरू करण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या

Upcoming Movies And Series : मे महिन्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी; 'हे' वेब सीरिज आणि सिनेमे होणार प्रदर्शित

Sanjay Jadhav : संजय जाधवांनी आजोबांना ऐकवली 'तमाशा लाईव्ह'ची नांदी; व्हिडीओ व्हायरल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela 2025 | महाकुंभ मेळाव्यात आज पहिलं अमृत स्थान Special ReportWalmik karad Macoca | वाल्मीक कराडवर मकोका, मुलासाठी आईची तळमळ, परळीत ठिय्या Special ReportRajkiya Shole Sharad pawar vs Amit Shah|अमित शाहांच्या टीकेला शरद पवारांचं तिखट उत्तर Special ReportRajkiya Shole on Walmik Karad | वाल्मीक कराडवर मकोका, आससापोटी गुन्हे वाढवत असल्याचा पत्नीचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Garbage Free Hour : बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
बुधवारी मुंबईत 'गार्बेज फ्री अवर', सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत कचरा मुक्तीसाठी सामूहिक स्वच्छता मोहीम
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
आधीच जागेची वानवा, कारसाठी जागा पार्कींगचा निर्णय; शासनाचे धोरण, ठाकरेंची प्रतिक्रिया, नागरिकांचाही संताप
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
मोठी बातमी! धनंजय मुंडे देवगिरीवर, अजित पवारांशी 10 मिनिटं चर्चा अन् थेट परळीला रवाना
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, थकवा, चेस्ट पेन; SIT पथकासह थेट रुग्णालय गाठलं
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: तू माझ्याकडून लाख रुपये घेतले, वाल्मिक कराडच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांनाच प्रतिसवाल
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Embed widget