Coldplay Concert क्रिस मार्टिननं 'वंदे मातरम' गायला सुरुवात करताच अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर वातावरण भारुन गेलं VIDEO
Coldplay Ahmedabad Concert: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्रिस मार्टिननं त्याच्या कोल्डप्ले बँडमेट्ससह उत्कृष्ट सादरीकरण केलं. प्रजासत्ताक दिनी त्यांनी प्रेक्षकांसाठी वंदे मातरम आणि माँ तुझे सलाम ही गाणी गायली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Coldplay Ahmedabad Concert: कोल्डप्ले रॉक बँडचा (Coldplay Rock Band) सध्या भारतभरात दौरा सुरू आहे. देशातील विविध शहरांमध्ये कोल्डप्लेच्या कॉन्सर्टचं (Coldplay Concert) दिमाखदार आयोजन करण्यात आलं. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोल्ड प्लेची भव्य कॉन्सर्ट पार पडली. यावेळी क्रिस मार्टिननं त्यांच्या बँड कोल्डप्लेसह दमदार सादरीकरण केलं. पण, क्रिस मार्टिननं केलेल्या एका कृतीमुळे सर्वच भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरची कॉन्सर्ट प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पार पडली. याच वेळी क्रिस मार्टिननं 'वंदे मातरम' आणि 'माँ तुझे सलाम' हे गाणं गायलं आणि क्रिसच्या याच कृत्यानं संपूर्ण देशभरातील नागरिकांच्या मनाला स्पर्श केला. यावेळी, प्रेक्षकांनीही क्रिसच्या सुरात सूर मिसळला आणि संपूर्ण स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमून गेला.
25 आणि 26 जानेवारी रोजी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कोल्डप्लेचा अहमदाबादमध्ये कॉन्सर्ट घेतली. या बँडनं 18 जानेवारी रोजी मुंबईत त्यांच्या म्युझिक ऑफ द स्फेयर्स इंडिया टूरला सुरुवात केली. त्यांनी 18, 19 आणि 21 जानेवारी रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये सादरीकरण केलं.
क्रिस मार्टिनचा व्हिडीओ व्हायरल
Chris Martin singing "Vande Mataram" 🥹 Republic Day Special😻
— Vi (@Wanderer_vi) January 26, 2025
Ending it with "Salute to Mother India" 🫶🫶#ColdplayAhmedabad #RepublicDay2025 #गणतंत्र_दिवस pic.twitter.com/XabhEtWl3V
कॉन्सर्ट दरम्यान, कोल्डप्लेने शाहरुख खान आणि क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह यांचे अभिनंदन केलं आणि ब्रिटिश राजवटीनं भूतकाळात केलेल्या अत्याचारांबद्दल भारताची माफीही मागितली. सचिन तेंडुलकर फाऊंडेशनच्या पाचव्या वर्धापन दिन सोहळ्यातही क्रिस मार्टिन सहभागी झाला होता.
🏟️ Coldplay in Ahmedabad! #ColdplayAhmedabad 🇮🇳 pic.twitter.com/mberKMN0iG
— Coldplay Access (@coldplayaccess) January 25, 2025
OTT वर पाहू शकता
क्रिस मार्टिनचा संपूर्ण बँडसोबतचा लाईव्ह परफॉर्मन्स 26 जानेवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट प्रसारित करण्यात आला होता. संध्याकाळी 7.45 वाजता प्लॅटफॉर्मवर ही कॉन्सर्ट अनेकांनी लाईव्ह पाहिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :