एक्स्प्लोर

World Cup 2023: भारत-ऑस्ट्रेलिया सामना कोण जिंकणार? रजनीकांतनंतर आता भाईजानची भविष्यवाणी

अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) देखील विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी केली आहे.

India vs Australia Final World Cup 2023: वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये होणाऱ्या सामन्यात कोण विजयी ठरणार? याची भविष्यवाणी अनेक जण करत आहेत. काही दिवसांपूर्वी सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth)  यांनी भविष्यवाणी केली होती. त्यांनी सांगितलं होतं की, "विश्वचषक आपलाच असणार याची मला 100% खात्री आहे". आता अभिनेता सलमान खाननं (Salman Khan) देखील विश्वचषकाबद्दल भविष्यवाणी केली आहे.

भाईजान म्हणतो, वर्ल्ड कप आपलाच!

टायगर-3 चित्रपटाच्या फॅन इव्हेंट दरम्यान सलमाननं भविष्यवाणी केली की, "टीम इंडिया रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजयी ठरेल."

पुढे सलमान म्हणाला, "भारताने आत्तापर्यंतचे सर्व सामने जिंकले आहेत आणि विश्वचषकादरम्यान, आम्ही टायगर 3 चित्रपट घेऊन आलो. आमच्या चित्रपटाने चांगले कलेक्शन केले. आता भारत वर्ल्ड कप जिंकेल आणि तुम्ही सर्व चित्रपटगृहात परत जाल," तो म्हणाला.

भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. या विजयासह भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. टीम इंडियाने सेमीफायनलपूर्वी या स्पर्धेत 9 सामने खेळले आणि ते सर्व जिंकले. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत धडक मारली.

प्रसिद्ध गायक करणार परफॉर्म

अंतिम सामन्यासाठी बीसीसीआयने प्रेक्षकांसाठी विविध गायकांच्या परफॉर्मन्सचं आयोजन केलं आहे.  गायक प्रीतम, जोनिता, नकाश अझीझ, अमित मिश्रा, आकासा सिंह आणि तुषार जोशी परफॉर्म करणार आहेत. दुसऱ्या डावाच्या ड्रिंक ब्रेक दरम्यान लेझर आणि लाइट शो केला जाईल.

सलमानचे चित्रपट

सलमान खानचा टायगर-3 हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत असून या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता सलमानचा टायगर वर्सेस पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

संबंधित बातम्या:

India Vs Australia World Cup Final : भारत-ऑस्ट्रेलिया सामना कोण जिंकणार? सुपरस्टार रजनीकांतने केली भविष्यवाणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  1 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Embed widget