एक्स्प्लोर
लंचला कधी येणार? काजोलच्या प्रश्नाला अजय देवगणचं ट्विटरवर उत्तर
अजय देवगणने चाहत्यांच्या प्रश्नांना ट्विटरवर मनमोकळेपणाने उत्तरं दिली. यामध्ये त्याची पत्नी अभिनेत्री काजोलनेही त्याला ट्विटरवर एक प्रश्न विचारला.
मुंबई : अभिनेता अजय देवगण सध्या त्याचा सिनेमा 'बादशाहो'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचाच भाग म्हणून त्याने आज चाहत्यांच्या प्रश्नांना ट्विटरवर मनमोकळेपणाने उत्तरं दिली. यामध्ये त्याची पत्नी अभिनेत्री काजोलनेही त्याला ट्विटरवर एक प्रश्न विचारला.
https://twitter.com/ajaydevgn/status/904634745073446916
लंचसाठी कधी येणार? असा प्रश्न काजोलने अजय देवगणला विचारला. अजय देवगणनेही आपण डाएटवर असल्याचं सांगत काजोलला लगेच उत्तर दिलं. अजय देवगण आणि काजोलचा हा किस्सा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
सिंघम 3 कधी येणार?
चाहत्यांनी अजय देवगणला त्याच्या आगामी सिनेमांविषयीही माहिती विचारली. सिंघम या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल कधी येणार, असा प्रश्नही अजय देवगणला विचारण्यात आला. कथानकाचं काम पूर्ण होताच, याबाबत माहिती देऊ, असं उत्तर अजय देवगणने दिलं.
https://twitter.com/ajaydevgn/status/904633814139277314
नरवीर तानाजी मालुसरेंचं शौर्य लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अजय देवगण तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमाबाबतही आपण लवकरच माहिती देऊ, असं अजय देवगणने चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
https://twitter.com/ajaydevgn/status/904631265671790593
दरम्यान काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. 2019 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement