The Kerala Story: पश्चिम बंगालमध्ये 'द केरळ स्टोरी' चित्रपटावर बंदी; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली माहिती
'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने बंदी घालती आहे.
The Kerala Story: 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) या चित्रपटाला काही लोक सपोर्ट करत आहेत तर काही लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करत आहेत. या चित्रपटाच्या कथानकावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. आता 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर पश्चिम बंगाल (West Bengal) सरकारने बंदी घातली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या निर्णयाबाबत सांगितलं.
"पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
West Bengal govt has decided to ban the movie 'The Kerala Story'. This is to avoid any incident of hatred and violence, and to maintain peace in the state: West Bengal CM Mamata Banerjee
— ANI (@ANI) May 8, 2023
"द काश्मीर फाइल्स" म्हणजे काय? हा चित्रपट लोकांच्या एका सेक्शनचा अपमान करतो. "द केरळ स्टोरी" म्हणजे काय? तर ही विकृत कथा आहे", असंही ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
What is "The Kashmir Files"? it is to humiliate one section. What is "The Kerala Story"?... It is a distorted story: West Bengal CM Mamata Banerjee pic.twitter.com/yRFwhlumum
— ANI (@ANI) May 8, 2023
पश्चिम बंगाल सरकारने 'द केरळ स्टोरी' या चित्रपटावर बंदी घातल्यानंतर या चित्रपटाचे निर्माते विपुल अमृतलाल शाह आणि दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान विपुलने म्हटले आहे की,'बंगालमध्ये चित्रपटावर बंदी घातल्यास आम्ही कायदेशीर मार्ग स्वीकारू'
Mumbai | If state governments won't listen to us, we will take legal action: Vipul Shah, Producer of film “The Kerala Story” on West Bengal banning the movie & Tamil Nadu theatre owners stopping screening of the movie
— ANI (@ANI) May 8, 2023
अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी यांनी 'द केरळ स्टोरी' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: