एक्स्प्लोर
Advertisement
‘वाघेऱ्या’तील गॉगलवालं बोकड मरता मरता वाचलं
या सिनेमात बोकडाची भूमिका आहे. त्यासाठी ते बोकड सेटवर आणले होते. मात्र हे बोकड, संध्याकाळच्या जेवणासाठी आणल्याचा समज आचाऱ्यांचा झाला.
मुंबई: 'वाघेऱ्या' सिनेमाच्या पोस्टरवरील चष्माधारी बोकड सध्या ट्रेण्डिंग आहे. वाघेऱ्या सिनेमातून ग्रामीण जीवनशैली विनोदी पद्धतीने मांडली आहे.
किशोर कदम, भारत गणेशपुरे आणि ऋषिकेश जोशीबरोबर पोस्टरवर झळकत असलेल्या या बोकडाचीदेखील 'वाघेऱ्या' मध्ये प्रमुख भूमिका आहे. मात्र, हे बोकड मरता मरता वाचलं.
या सिनेमात बोकडाची भूमिका आहे. त्यासाठी ते बोकड सेटवर आणले होते. मात्र हे बोकड, संध्याकाळच्या जेवणासाठी आणल्याचा समज आचाऱ्यांचा झाला. त्यामुळे त्यांनी ते चष्मेबहाद्दर बोकड थेट स्वयंपाक घरात घेऊन गेले.
तिकडे सेटवर शूटिंगची सर्व तयारी झाल्यानंतर बोकड अचानक गायब झाल्याचे दिसलं. त्यामुळे त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु झाली.
त्यादरम्यान, सिनेमातल्या वाघाला डांबण्यासाठी आणलेलं हे बोकड स्वयंपाकघरात नेल्याची माहिती सेटवरील एका माणसाला कळली, आणि एकच धांदल उडाली.
मग सगळ्यांनी धावतपळत जात बोकडाला तिथून बाहेर काढलं आणि या बोकडाचा रस्सा होता होता वाचला. आता हे बोकड ऑनस्क्रीनच नव्हे तर ऑफस्क्रीनदेखील संपूर्ण युनिट मेंबरचे लाडके बनले आहे.
समीर आशा पाटील दिग्दर्शित 'वाघेऱ्या' हा सिनेमा येत्या 18 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
पुणे
निवडणूक
Advertisement