एक्स्प्लोर

Baipan Bhaari Deva: 'प्रोडक्ट बाजारात विकण्यासाठी...'; 'बाईपण भारी देवा' च्या यशाबाबत विजू मानेंनी शेअर केली पोस्ट

 विजू माने (Viju Mane) यांनी नुकतीच 'बाईपण भारी देवा'  (Baipan Bhaari Deva) या चित्रपटाच्या यशाबाबत एक खास पोस्ट शेअर केली.

Baipan Bhaari Deva: 'बाई पण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा मराठी चित्रपट भारतातच नाही तर परदेशातील बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटामधील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.  अनेक जण या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. दिग्दर्शक  विजू माने  (Viju Mane) यांनी नुकतीच 'बाईपण भारी देवा' या चित्रपटाच्या यशाबाबत एक खास पोस्ट शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

विजू माने यांनी  पोस्टमध्ये लिहिलं,'मराठी चित्रपट रसिक प्रेक्षकहो तुमचे मनापासून आभार. सध्या तिकीट बारी वर "बाई पण भारी देवा" हा 'भारीच' जमून आलेल्या सिनेमा 'भारी' गर्दी जमवतो आहे. ज्याचा मला एक मराठी चित्रपटकर्ता म्हणून अभिमान आहेच. त्याबद्दल केदार शिंदे आणि त्याच्या टीमचं विशेषतः लेडीज ब्रिगेडचं मनापासून अभिनंदन. रसिक प्रेक्षकांना दूषणं देऊन काहीही होत नाही. 'उत्तम सिनेमा' हा एकमेव यशाचा मार्ग आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मराठी लोक मराठी सिनेमांना गर्दी करत नाहीत याची कारणे मराठी सिने निर्माते आणि दिग्दर्शक यांनी शोधली आणि त्या बरहुकूम सिनेमे बनवले तर लोक गर्दी करतात हे आता दिसून आलं आहे. आत्ताच्या अंदाजानुसार तिकीट बारी वरील सर्वाधिक कमाईचा विक्रम सिनेमा करण्याची शक्यता आहे. मला याबाबतीत जिओचे निखिल साने यांचं कौतुक वाटतं. उगाचच कुणाच्यातरी पदरी देव अमाप यश टाकत नसतो. त्यामागे त्या व्यक्तीचा संशोधन, अनुभव आणि योग्य वेळ साधून करावयाच्या गोष्टी याचं कौशल्य अशा अनेक गोष्टी कारणीभूत असतात. 

'सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही मार्केटच्या स्वभावानुसार आता पुन्हा एकदा स्त्रियांवर आधारित सिनेमांची लाट येऊ शकेल. त्यात काही वावगं आहे असं मी म्हणणार नाही. कारण जे खपतं ते विकावं हा एक सामान्य बुद्धी असलेल्या व्यावसायिकाचा आडाखा असणारच. मुळात सिनेमा बनवताना कोणीही 'चला आज वाईट सिनेमा बनवूया' असं म्हणून सिनेमा बनवत नाही. पण चांगला सिनेमा बनवण्यासाठी केवळ 'मला ही गोष्ट फार आवडली, म्हणून मी हा सिनेमा केला' असे निर्माते नकोत. इतर व्यवसायांनी जसं सर्वे, प्रवाह आणि नेमका टार्गेट ऑडियन्स असा अभ्यास करून मग आपले प्रोडक्ट बाजारात विकण्यासाठी आणण्याची वाट निवडली हीच पद्धत आता मराठी सिनेमांनी उत्तरोत्तर स्वीकारायला हवी. आणि मराठी प्रेक्षकांना पुन्हा एकदा थेटरमध्ये टाळ्या शिट्ट्या नाच करत सिनेमा एन्जॉय करण्याची 'सवय' लावायला हवी. आता यातही 'प्रेक्षकानुनय केलेला सिनेमा' 'त्यात काय एवढं?' 'मला बाई फार नाही आवडला' 'आशयघनता कुठे आहे?' "सिनेमात डेप्थ नाही' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया असतील, त्या असणारच.But nothing succeeds like success. 'बाई पण भारी देवा' च्या सगळ्या टीमला आणि त्या टीमला यश देणाऱ्या अख्या जगभरच्या रसिक प्रेक्षकांना मला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. मराठी चित्रपटांच्या नावानं चांगभलं' असंही विजू माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.विजू माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by viju mane (@vijumaneofficial)

 रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) या अभिनेत्रींनी बाईपण भारी देवा या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल, अनामत रकमेच्या व्याजाचं काय असा सवाल 
म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल
Rohit Sharma : विराट कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video  
कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार

व्हिडीओ

Nashik BJP VS Shiv Sena Thackeray :  आयारामांचं संकट? नाशिक भाजपात कटकट! Special Report
Sayaji Shinde Vanrai : सयाजींच्या वनराईवर कुणाची वाकडी नजर? Special Report
Municipal Corporation Election 2026 : महानगरपालिका निवडणुकीतही घराणेशाहीचा दबदबा Special Report
Prashant Jagtap NCP : प्रशांत जगताप काँग्रेसचा हात धरणार? अजितदादांमुळे काकाशी कट्टी... Special Report
Kishor Jorgewar Vs Mungantiwar : जोरगेवार भी खुश, मुनगंटीवार भी खुश? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
मुनगंटीवारांच्या नाराजीनाट्यामुळं काय बदललं? चंद्रपुरात भाजपचा सर्वांना खुश करणारा तोडगा
Mhada Pune Lottery : म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल, अनामत रकमेच्या व्याजाचं काय असा सवाल 
म्हाडा पुणेच्या 4186 घरांची सोडत अनिश्चित काळासाठी लांबणीवर, 2 लाख 15 हजार अर्जदार हवालदिल
Rohit Sharma : विराट कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video  
कोहलीचा छोटा चाहता मॅच संपताच धावत आला, रोहित शर्मानं एका कृतीनं सर्वांची मनं जिंकली पाहा Video
Vasai Virar Election : वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
वसई-विरारचा तिढा सुटला, 91 जागांवर भाजप तर 24 जागांवर शिंदेंची शिवसेना लढणार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
भाजपचा तो पराभव माझ्यामुळे झाला तर आनंदाची बाब; एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार
Gold Rate : सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले? अधिक परतावा कुठं मिळणार? 
सोने चांदीच्या दरवाढीचा ट्रेंड कायम, 2026 मध्ये दर किती रुपयांपर्यंत वाढणार? तज्ज्ञ काय म्हणाले?
Army Social Media Policy : सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
सैन्य दलातील जवानांना इन्स्टाग्रामवर खातं उघडता येणार पण... 'या' गोष्टींना मनाई, भारतीय सेना दलाकडून नवे नियम
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
पुण्यात एकहाती सत्ता राखण्यासाठी भाजपची खेळी; उमेदवारी वाटपाचा फॉर्म्युला ठरला, जुन्यांना पुन्हा संधी
Embed widget