Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड!
Liger : समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले आहे.
![Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड! Vijay Deverakonda’s Liger Poster trending on social media from release Liger : ‘लायगर’च्या पोस्टरचा विक्रम! प्रदर्शित होताच झाले सोशल मीडियावर ट्रेंड!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/c9701bb53d4e0986a4feb76ed48040c1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Liger : करण जोहरचा आगामी चित्रपट ‘लायगर’ (Liger) रिलीज पूर्वीच चर्चेत आला आहे. नुकतेच या चित्रपटातील विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) एक जबरदस्त लूक रिलीज करण्यात आला आहे. या पोस्टरची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. पोस्टर रिलीज झाल्यापासून सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. शिवाय, पोस्टरच्या लोकप्रियतेने रिलीज आधीच नवीन विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. याचेच सर्वात मोठे उदाहरण म्हणजे हे पोस्टर रिलीज झाल्यानंतर तब्बल 24 तास ते ट्विटरवर ट्रेंड होत होते.
फारच कमी वेळात या पोस्टरने इंटरनेटवर विशेषत: देशातील सेलिब्रिटींपासून ते प्रेक्षक आणि चाहते महिला चाहत्यांमध्ये आपले स्थान पटकावले आहे. #SexiestPosterEver पासून #DreamManVijay पर्यंत, #HottestManAlive आणि #FavPosterBoy या हॅशटॅगसह हे पोस्टर शनिवारी सकाळी 10:30 ते रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत भारतातील टॉप ट्रेंडमध्ये सामील झाले होते.
पाहा पोस्टर :
समंथा रुथ प्रभूपासून ते जान्हवी कपूर, सारा अली खान, रश्मिका मंदाना, अनुष्का शेट्टी, पूजा हेगडे आणि अनन्या पांडे या भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींनी या पोस्टरचे कौतुक केले आहे. या पोस्टरने आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. सर्वात जलद गतीने 1 दशलक्ष लाईक्स गाठणारे हे पहिले भारतीय चित्रपट पोस्टर बनले आहे. या पोस्टरने अवघ्या 4 तासांत हा विक्रम केला आहे. 25 ऑगस्ट 2022 पासून 'Liger' हा चित्रपट मोठ्या पडद्यावर येत आहे.
अनन्या पांडे झळकणार मुख्य भूमिकेत!
या चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साऊथ स्टार विजय देवरकोंडा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर, अनन्या पांडेही 'लायगर'मधून साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे.
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लॉस वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.
संबंधित बातम्या
Happy Birthday Vijay Deverakonda : कधी काळी घरभाड्यासाठी पैसे नव्हते, तरी पहिल्या पुरस्कारातून केले ‘हे’ सत्कार्य! जाणून घ्या अभिनेता विजय देवरकोंडाबद्दल...
PHOTO : पहिल्या फिल्म फेअर पुरस्काराचा लिलाव करून दान केले पैसे! वाचा विजय देवरकोंडाच्या खास गोष्टी...
Vijay Deverakonda : रश्मिकाशी लग्न करणार का? पाहा काय म्हणाला विजय देवरकोंडा...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)