एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO : पहिल्या फिल्म फेअर पुरस्काराचा लिलाव करून दान केले पैसे! वाचा विजय देवरकोंडाच्या खास गोष्टी...

Vijay Deverakonda
1/6

तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आज (9 मे) त्याचा 33वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचा जन्म 9 मे 1989 रोजी हैदराबाद येथे झाला. 'अर्जुन रेड्डी' फेम या अभिनेत्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
2/6

अभिनेता विजयने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. देवरकोंडा यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी संबंधित काही अतिशय मनोरंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
3/6

विजयचे कुटुंबीय त्याला 'राऊडी' नावाने हाक मारते. विजयने त्याच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2011 मध्ये रोमँटिक कॉमेडी फिल्म 'नुव्विला'मधून केली होती.
4/6

पण, 2015 मध्ये आलेल्या 'यवेदा सुब्रमण्यम' या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या दमदार भूमिकेमुळे त्याला मनोरंजन विश्वात खरी ओळख मिळाली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
5/6

अभिनेता विजय देवराकोंडा याला 'अर्जुन रेड्डी' चित्रपटासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्याने या पुरस्काराचा 25 लाख रुपयांना लिलाव केला आणि संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री आपत्ती निवारण निधीला दान केली.
6/6

अर्जुन रेड्डी' या चित्रपटातून विजय देवरकोंडा याला राष्ट्रीय स्तरावर अभिनेता म्हणून हक्काची ओळख मिळाली. बॉलिवूडचा 'कबीर सिंह' हा चित्रपट 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा रिमेक आहे.
Published at : 09 May 2022 09:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
