Vijay Deverakonda : 'लायगर'ची खास झलक, करण जोहरने शेअर केला विजय देवरकोंडाचा भन्नाट लूक! पाहा पोस्टर...
Vijay Deverakonda : बहुचर्चित 'लायगर' (Liger) या चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) जबरदस्त लूक रिलीज करण्यात आला आहे.
Vijay Deverakonda : बहुचर्चित 'लायगर' (Liger) या चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) जबरदस्त लूक रिलीज करण्यात आला आहे. निर्माता कारण जोहर (Karan Johar), आणि अभिनेत विजय देवरकोंडा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर याचे पोस्ट शेअर करून, या पात्राची झलक दाखवली आहे. हे भन्नाट पोस्टर पाहून चाहते मात्र चांगलेच गोंधळात पडले आहेत. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. मात्र, नुकतेच समोर आलेले पोस्टर या चित्रपटाच्या कथेला नक्कीच ट्वीस्ट देणारे आहे.
या चित्रपटात विजय देवरकोंडा व्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. साऊथ स्टार विजय देवरकोंडा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर, अनन्या पांडेही 'लायगर'मधून साऊथ इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे.
पाहा पोस्टर :
या पोस्टरमध्ये विजय देवरकोंडा हटके अंदाजात दिसत आहे. पोस्टरमध्ये विजय न्यूड उभा असून, त्याने हातात गुलाबाचा पुष्पगुच्छ धरला आहे. करण जोहरने हे पोस्टर शेअर करताना हटके कॅप्शन लिहिले आहे. ‘रोज रोज ऐसे गिफ्ट नही मिलते’, असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अनेक रोमांचक पैलू दिसणार आहेत. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश असणार आहे. या स्पोर्ट्स ड्रामामध्ये विजय देवराकोंडा पूर्वी कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. निर्मात्यांनी मुंबई, अमेरिका, लॉस वेगास, हैदराबाद इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे.
'लायगर' चित्रपटामध्ये रम्या कृष्णन, रॉनित रॉय, विशू रेड्डी, अली, मकरंद देशपांडे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'लायगर' चित्रपट पुरी जगन्नाथ आणि चार्मी कौर यांच्या 'पुरी कनेक्ट्स' आणि करण जोहरच्या 'धर्मा प्रॉडक्शन्स'च्या बॅनरखाली सहनिर्मिती केला आहे. 25 ऑगस्ट रोजी हा चित्रपट सर्व भाषांमध्ये जगभरातील सिनेमाघरांमध्ये दाखल होईल.
संबंधित बातम्या