एक्स्प्लोर

Vicky Kaushal : अनुराग कश्यपसाठी विकी कौशल झाला डीजे, सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

Vicky Kaushal First Look : अनुराग कश्यपच्या 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या सिनेमात विकी कौशल डीजेचे पात्र साकारणार आहे.

Vicky Kaushal First Look : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या (Vicky Kaushal) चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विकी आता अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) आगामी सिनेमात झळकणार आहे. 'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' (Almost Pyaar With DJ Mohabbat) असे या सिनेमाचे नाव आहे. सिनेमातील विकीचा लूक समोर आला असून या सिनेमात विकी 'डीजे'च्या भूमिकेत दिसणार आहे. 

विकी कौशलने फर्स्ट लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत त्याने अनुराग कश्यपसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिलं आहे,"मला पहिला ब्रेक देणाऱ्या माणसावर माझं खूप प्रेम आहे. आता मी डीजेवाला झालो आहे". विकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' या सिनेमातील भूमिकेबद्दल विकी कौशल म्हणाला,"अनुराग सरांनी आजवर एक उत्तम मार्गदर्शक, मित्र म्हणून मला पाठिंबा दिलेला आहे. सिनेजगतातील ते माझे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी जेव्हा मला सिनेमासाठी विचारणा केली तेव्हा मी लगेच होकार दिला. हा माझ्या खास मित्राने बनवलेला खास सिनेमा आहे". 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत' 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

'अलमोस्ट प्यार विथ डीजे मोहब्बत'  हा सिनेमा 3 फेब्रुवारी 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेात विकी कौशलसोबत अलायादेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर करण मेहता या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून आता प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 

अनुराग कश्यपच्या 'मसान' या सिनेमाच्या माध्यमातून विकी कौशलने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला होता. पण या सिनेमातील विकीच्या अभिनयाचं मात्र कौतुक झालं होतं. या सिनेमात विकी कौशलसोबत ऋचा चड्ढा आणि श्वेता त्रिपाठी मुख्य भूमिकेत झळकले होते. 

सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मनोरंजनविश्वात एन्ट्री!

बॉलिवूडमध्ये अभिनेता होण्यापूर्वी विकी कौशलने 'गँग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. विकी दिग्दर्शक अनुराग कश्यपला आपला गुरू मानतो. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच त्यांने थिएटर करायला सुरुवात केली. विकी कौशल अनुराग कश्यपच्या 'लव शव ते चिकन खुराना' आणि 'बॉम्बे वेल्वेट' या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकेत दिसला होता.

संबंधित बातम्या

Pathan Worldwide Box office : जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा बोलबाला; चार दिवसांत 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget