एक्स्प्लोर

Pathan Worldwide Box office : जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा बोलबाला; चार दिवसांत 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील!

Pathan Day 4 Collection : 'पठाण' हा सिनेमाने आतापर्यंत जगभरात 400 कोटींचा टप्पा पार केला आहे.

Shah Rukh Khan Pathan Worldwide Collection : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'पठाण'ची (Pathan) क्रेझ जगभरात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या या सिनेमाने चार दिवसांत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 

जगभरात शाहरुखच्या 'पठाण'चा जलवा!

भारतीय सिनेप्रेक्षकांप्रमाणे परदेशातील शाहरुखच्या चाहत्यांची पाऊलदेखील 'पठाण' सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहाकडे वळत आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी परदेशात या सिनेमाने 49 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता या सिनेमा जगभरातील बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरात आतापर्यंत या सिनेमाने 429 कोटींचा गल्ला जमवला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

भारतात 'पठाण'चा बोलबाला!

'पठाण' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ओपनिंग डेला (Opning Day) 55 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 68 कोटी, तिसऱ्या दिवशी 38 कोटी आणि चौथ्या दिवशी 50 कोटींची कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने रिलीजच्या चौथ्या दिवसापर्यंत 211 कोटींची कमाई केली आहे. 

शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा जगभरात 8000 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात शाहरुखसह दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहमदेखील (John Abrham) मुख्य भूमिकेत आहेत. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुखने चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं आहे. 

शाहरुखचे (Shah Rukh Khan) चाहते गेल्या चार वर्षांपासून त्याच्या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. आता 'पठाण'च्या माध्यमातून तो चाहत्यांच्या भेटीला आला आहे. चाहते आपल्या लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन पाहत आहेत. हजारो रुपये खर्च करुन वादाच्या भोवऱ्यात अडकलेला लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहताना चाहते मात्र आनंदी आहेत. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाचे अनेक खास शो आयोजित करण्यात येत आहेत. टाळ्या, शिट्ट्या वाजवत चाहते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटीचा सिनेमा पाहत आहेत. बॉलिवूडसाठी मागचं वर्ष खास नव्हतं. पण या वर्षाच्या सुरुवातीलाच शाहरुखच्या 'पठाण'ने बॉलिवूडला सुगीचे दिवस दाखवले आहेत. 

संबंधित बातम्या

Pathan : राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात शाहरुख खानच्या 'पठाण'चे स्पेशल स्क्रिनिंग; फोटो समोर

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
करीना कपूर खरंच प्रेग्नेंट? लेटेस्ट व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, चाहते म्हणाले, 'लवकरच तिसरा पाहुणा येणार...'
Prajakta Mali Short Hair: प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
प्राजक्ता माळीचा मेकओव्हर, पूर्ण लूकच बदलला; नव्या सिनेमासाठी हटके स्टाईल, चाहत्यांकडूनही गोड स्माईल
Salman Khans Body Double: सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
सलमान खानच्या सिनेमाच्या सेटवर भयंकर घडलं; बॉडी डबलला आला हृदयविकाराचा झटका; भाईजान स्वत: करणार स्टंट
Veteran Actress Death: ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा
ज्येष्ठ प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, ICUमध्ये सुरु होते उपचार; गरोदरपणात दिली 10वीची परीक्षा, सिनेविश्वावर शोककळा

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget