ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन
मराठी, हिंदी सिनेमा, रंगभूमी, जाहीरात या विविध माध्यमांमधील अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. किशोर प्रधान यांच्या निधनानं सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होती. वयाच्या 83 व्या वर्षी मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी, हिंदी सिनेमा, रंगभूमी, जाहीरात या विविध माध्यमांमधील अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. किशोर प्रधान यांच्या निधनानं सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
'शिक्षणाचा आयचा घो', 'लालबाग परळ', 'भिंगरी', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय', 'लंडनचा जावई' या मराठी चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. तर हिंदीत 'लगे रहो मुन्नाभाई', 'जब वुई मेट' सिनेमातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिल्या.
किशोर प्रधान यांनी 100 हून अधिक मराठी सिनेमांमध्ये, तर 18 इंग्रजी नाटकांमध्ये काम केलं. बॉटम अप्स हे त्यांच् पहिलं इंग्रजी नाटक होतं. याशिवाय त्यांना अनेक स्टेज शोमध्ये काम केलं.