एक्स्प्लोर
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना डिस्चार्ज

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानू त्यांच्यासोबत होत्या.
ताप आणि न्यूमोनिया झाल्याने 93 वर्षीय दिलीप कुमार यांना 15 एप्रिल रोजी लीलावतीत दाखल करण्यात आलं होतं.
दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना ते लवकरच बरे होतील, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेले डॉ.जलील पारकर यांनी दिली.
दरम्यान, अभिनेता आमिर खाननेही रुग्णालयात जाऊन दिलीप कुमार यांची विचारपूस केली होती.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement




















