![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Famous Actor Birbal: कॉमेडियन बिरबल यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बिरबल (Birbal) यांनी वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
![Famous Actor Birbal: कॉमेडियन बिरबल यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास Veteran actor Birbal Khosla passes away at 84 age Famous Actor Birbal: कॉमेडियन बिरबल यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/13/f7d23b2a254ad02d64501fdc8ae7f5d41694580816412259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Famous Actor Birbal: प्रसिद्ध कॉमेडियन बिरबल (Birbal) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
बिरबल (Birbal) हे बऱ्याच दिवसांपासून आजारी होते, असं म्हटलं जात आहे. कॉमेडियन बिरबल यांचे खरे नाव सतींदर कुमार खोसला होते आणि त्यांचे खरे नाव त्यांच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांच्या क्रेडिटमध्ये वापरले गेले होते. पण अभिनेता मनोज कुमार यांनी सतींदर यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वानुसार 'बिरबल' हे नाव सुचवले होते आणि नंतर त्यांनी ते मान्य केले. सतींदर यांनी त्यांचे स्क्रीन नाव 'बिरबल' ठेवले.
हिंदी, पंजाबी, भोजपुरी आणि मराठी चित्रपटांमध्येबिरबल यांनी काम केले. त्यांना 1964 मध्ये रिलीज झालेल्या राजा (Raja) या चित्रपटातून पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटामधील एका गाण्यात त्यांनी काम केले.
राजा या चित्रपटानंतर बिरबल यांनी दो बदन, बूंद जो बन गए मोती, शोले, मेरा गाव मेरा देश, क्रांती, रोटी कपडा और मकान, उर्वेश, अमीर गरीब सदमा, दिल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 500 हून अधिक चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखा साकारल्या.बिरबल यांनी त्यांच्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती.
दिलीप ठाकूर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'अभिनेते मेहमूद जेव्हा फॉर्ममध्ये होते तेव्हा बिरबल यांनी काम करायला सुरुवात केली. पण मेहमूद, जगदीप, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि राजेश खन्ना यांसारखे दिग्गज असूनही, बिरबल यांनी आपल्या भूमिकांनी इंडस्ट्रीत स्वतःचे एक खास स्थान निर्माण केले. सुरुवातीच्या काळात त्यांनी रोजंदारीवर काम केले. पण बिरबल यांनी अभिनयक्षेत्रात झोकून देऊन काम केले आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. ते छोट्या भूमिकांसाठी ओळखला जात होते पण त्यांनी इंडस्ट्रीत विशेष ओळख निर्माण केली.'
1975 मध्ये रिलीज झालेल्या शोले (Sholay) या क्लासिक बॉलिवूड चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. या चित्रपटामध्ये त्यांनी अर्धवट मिशा असलेल्या कैद्याची भूमिका केली होती. बिरबल यांच्या निधनानं हिंदी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
संबंधित बातम्या:
Jailer Actor Death: अभिनेते जी मारीमुथू यांचे निधन; वयाच्या 58 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)