Ved On OTT: रितेश- जिनिलियाचा 'वेड' आता ओटीटीवर पाहता येणार; कधी आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर होणार रिलीज? जाणून घ्या
रितेश (Riteish Deshmukh) आणि जिनिलाया (Genelia Deshmukh) यांचा वेड (Ved) हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.
Ved On OTT: अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्या 'वेड' (Ved) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतला. या चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील रितेश आणि जिनिलियाच्या केमिस्ट्रीचं अनेकांनी कौतुक केलं. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांना आवडली. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरबसल्या बघताना येणार आहे. रितेश आणि जिनिलाया यांचा हा चित्रपट लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे. कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज होणार आहे? ते जाणून घेऊयात...
डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेड हा चित्रपट प्रेक्षकांना बघताना येणार आहे. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. डिज्नी प्लस हॉटस्टारच्या इन्स्टाग्रामवरील पेजवर वेड चित्रपटाचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'सत्या आणि श्रावणीच्या प्रेमाचं वेड आम्हाला पण लागलं आहे. वेड हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये 28 एप्रिलला स्ट्रीम केला जाणार आहे.'
View this post on Instagram
वेड चित्रपटाची स्टार कास्ट
वेड हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटात रितेश आणि जिनिलिया यांच्यासोबतच अशोक सराफ (Ashok Saraf), विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि जिया शंकर या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
गाण्यांना मिळाली प्रेक्षकांची पसंती
वेड या चित्रपटामधील वेड लावलंय, सुख कळले, बेसुरी या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. या गाण्यांवरील डान्सचे व्हिडीओ सध्या अनेक नेटकरी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. जिनिलिया आणि रितेश हे गेली 20 वर्षे सिनेसृष्टीत काम करत आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. वेड चित्रपटाचे दिग्दर्शन रितेशनं केलं असून चित्रपटाची निर्मिती जिनिलियानं केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :