'मी घरात एकटी होती, अन् अचानक 'तो' बाल्कनीतून घुसला...'; प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?
Tejaswi Prakash Reveals Shocking Stalker Incident: अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या घराकडे एक अज्ञात व्यक्ती पाळत ठेवून होता. तिनं मुलाखतीतून खुलासा केला.

Tejaswi Prakash on Stalker: तेजस्वी प्रकाश ही टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक. तिनं मराठी सिनेसृष्टीतही काम केलं. तिचा चाहतावर्ग मोठा आहे. ती आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही प्रंचड चर्चेत असते. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं एक मोठा खुलासा केला. जे ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की, एक अज्ञात व्यक्ती तिचा वारंवार पाठलाग करत होता. तो व्यक्ती इतक्यावरच थांबला नाही. त्यानं तेजस्वीचं घर गाठलं आणि त्याच्या घरातही घुसला. त्यावेळी अभिनेत्री घरी एकटी होती, अशी माहिती तेजस्वी प्रकाशने दिली. या परिस्थितीला तिनं कसं हाताळलं? नेमकं काय घडलं? याची माहिती तेजस्वीनं मुलाखतीतून दिली.
मुलाखतीत तेजस्वी प्रकाश म्हणाली, 'एक अज्ञात व्यक्ती वारंवार घरी पत्र पाठवत होता. तसेच तिचा पाठलागही करत होता. घराच्या अंगणासमोर तो पत्र ठेवून जायचा. जेव्हा मी घरातून बाहेर पडायची, तेव्हा अंगणात मला ही पत्र दिसायची. मी तेव्हा विचार करायची, ही पत्र नेमकं कोण आणि का पाठवत असेल? पत्र पाठवण्यामागचं कारण काय? असे प्रश्न मनात येत होते. या कारणामुळे आम्ही घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले होते. परंतु, तो अज्ञात व्यक्ती कधी कॅमेरामध्ये कैद झाला नाही', असं अभिनेत्री म्हणाली.
'हे प्रकरण इथेच थांबले नाही. त्या अज्ञात व्यक्तीनं बाल्कनीतून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी माझ्या घरात एकटी होते. नशीब, त्यावेळेस माझी आई आणि ड्रायव्हर घरी आले. त्यांनी दोघांनी त्या अज्ञात व्यक्तीला बाल्कनीमध्ये पकडलं. आम्ही त्याला तातडीने पोलिसांकडे नेले. तो खूप विचित्र पत्र पाठवत होता. सुरुवातीला त्याला करण समोर उभे केले. नंतर त्या व्यक्तीला पोलिसांकडे नेण्यात आले', अशी माहिती अभिनेत्रीनं दिली.
तेजस्वी प्रकाशबाबत सांगायचं झाल्यास, ती एक सुप्रसिद्ध टीव्ही अॅक्ट्रेस आहे. ती अभिनेता करण कुंद्राला डेट करत आहे. दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची लव्ह स्टोरी बिग बॉस सिझन 15 पासून सुरु झाली. या शोमध्ये दोघांची जवळीक वाढली. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच दोघांमधील प्रेम फुलत गेलं. दोघांचे एकत्रित कपल व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात. या कपलमधील बॉन्ड स्ट्रॉन्ग आणि सुंदर आहे. सध्या हे जोडपे लाफ्टर शेफ 3 मध्ये दिसत आहे. दोघांची धम्माल या शोमधून आपल्याला पाहायला मिळते. सध्या त्यांचे चाहते, हे जोडपं कधी विवाहबंधनात अडकणार? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष





















