एक्स्प्लोर

रोहित शेट्टी घरावरील गोळीबार प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात मोठी माहिती; भाजप आमदारालाही धमकीचे फोन, नेमकं काय घडलं?

Rohit Shetty Residence Attack: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबाराची घटना. अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तपासाची माहिती.

CM Devendra fadnavis on Rohit Shetty: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर अज्ञाताकडून झालेल्या गोळीबार प्रकरणात अनेक धागेदोरे सापडत आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर मकोका लावण्यात आला आहे. शुभम लोणकरच्या भावालाही ताब्यात घेण्यात आलं आहे.  दरम्यान, या प्रकरणाबाबत आज अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात तपासाची बाजू आणि केलेल्या कारवाईंबाबत माहिती दिली.

विधीमंडळात राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. सभागृहात रोहित शेट्टी घरावरील गोळीबार प्रकरणी चर्चा झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार  मिलिंद नार्वेकर यांनी विधानपरिषदेत दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रश्न विचारला. सरकारने दिलेल्या लेखी उत्तरावर आपण समाधानी असून, हा विषय वाढवत नसल्याचे मिलिंद नार्वेकर यांनी सांगितलं.  यानंतर सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाक वाजवून त्यांच्या वक्तव्याचे स्वागत केले. 

परंतु, ठाकरे गटाचे सचिन अहिर, अनिल परब यांनी, मिलिंद नार्वेकर यांचे समाधान झाले असले तरी आमचे समाधान झाले नसल्याचे सांगत हा मुद्दा उचलून धरला. दरम्यान, एकाच पक्षातील आमदारांची वेगवेगळी भूमिका या निमित्ताने समोर आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी केलेल्या कारवाईंबाबत सभागृहात माहिती दिली.  मुख्यमंत्री म्हणाले, 'दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या इमारतीवर एका अज्ञाताने गोळीबार केला होता. मुंबई पोलिसांनी 13 आरोपींना ताब्यात घेतलं. मकोका त्यांच्यावर लावण्यात आला. बिष्णोईचा महाराष्ट्रातील ऑपरेटर शुभम लोणकर याच्या भावाला अटक झाली. शुभम लोणकरवरही योग्य कारवाई केली जाईल. तो सध्या परदेशात बसून फोन करून धमक्या देतोय. आधी काँग्रेस पक्षातील आमदाराला  फोन करुन धमकी दिली.  आता भाजप आमदाराला देखील त्याने धमकीचा फोन केला आहे',  अशी माहिती त्यांनी दिली. 

सभागृहात देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

'बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या निवासस्थानी असलेल्या टॉवरच्या भिंतीवर एका व्यक्तीनं  गोळीबार केला आणि फरार झाला. आपण या प्रकरणी गुन्हा नोंदवून घेतला आहे.  पोलिसांनी तपास करुन 13 आरोपींना अटक केली.  आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मुख्य म्हणजे शुभम लोणकरच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. शुभम लोणकर सध्या परदेशात आहे. त्याला देखील लवकरात लवकर अटक करु', असे आश्वासन यावेळी फडणवील यांनी दिले. 

एनआयएच्या माध्यमातून  अनमोल बिष्णोईला अटक करण्यात आली आहे. चौकशीसाठी त्याला मुंबईत आणावं, अशी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे',  असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 'लोणकर हा अकोला जिल्ह्यातील रहिवाली आहे. आमच्या भाजप आमदाराकडे इतका पैसा नाही. ते गरीब असून,  त्यांना देखील फोन केला. जिथे जिथे त्यांनी हे कृत्य केलं आहे. तिथे पोलिसांनी योग्य ती कारवाई केली आहे. मी यावेळी सभागृहाला असे आश्वासन देतो की, गँगवॉर होणार नाही', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Virar Crime: प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टरनं फसवलं, विरारमध्ये महिलेनं स्वतःला संपवलं; हिरोईन बनवण्याचं आमिष, शारीरिक शोषण, ब्लॅकमेलिंग अन् एक कोटी... नेमकं काय घडलं?
23 Va Majala Marathi Theatre Play: मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...
मुंबईच्या गगनचुंबी इमारतीतील सस्पेन्सचा थरार; शशांक केतकर, अनिकेत विश्वासराव '23 वा मजला' रंगभूमीवर...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Yuzvendra Chahal: 'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
'दारूच्या आहारी गेलो, पॅनिक अटॅकने तोंड वाकडं व्हायचं, ओठ एका बाजूला ओढल्याने बोलता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे 26 दिवस..' ; घटस्फोटानंतरची चहलने सांगितली भयावह कहाणी
Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Embed widget