एक्स्प्लोर

Shraddha Kapoor Aunt Tejaswini Kolhapure: 39 वर्षांची श्रद्धा कपूर लग्नबंधनात अडकणार? बॉयफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, मावशीच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण

Shraddha Kapoor Aunt Tejaswini Kolhapure: 'फ्री प्रेस जर्नल'शी साधलेल्या संवादात, श्रद्धा कपूरची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अभिनेत्रीच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे. श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांवर तिची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

Shraddha Kapoor Aunt Tejaswini Kolhapure: बॉलिवूडची (Bollywood News) चुलबुली अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) लग्न करतेय, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा श्रद्धाच्या चाहत्यांचा हॉर्ट ब्रेक झाला आहे. श्रद्धा कपूरच्या लग्नाबाबतच्या चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. श्रद्धा कपूरचं नाव बऱ्याच काळापासून लेखक राहुल मोदीसोबत (Rahul Mody) जोडलं जातंय. अनेकदा दोघे एकत्र स्पॉटही झालेत, त्यामुळे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही सांगितलं जातंय. अशातच चाहतेही श्रद्धाला नववधू लूकमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता पुन्हा एकदा श्रद्धा आणि राहुल मोदी यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यासाठी कारण आहे, श्रद्धाची मावशी अभिनेत्री तेजस्विनी कोल्हापुरे यांनी केलेलं वक्तव्य. 

'फ्री प्रेस जर्नल'शी साधलेल्या संवादात, श्रद्धा कपूरची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अभिनेत्रीच्या लग्नाविषयी भाष्य केलं आहे. श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांवर तिची मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. "खरोखर? मला याबद्दल काहीच कल्पना नाही. मला याविषयी अजिबात काहीच ठाऊक नाही...", असं श्रद्धा कपूरची मावशी म्हणाली आहे.  

श्रद्धाचे कौतुक करतानाच, तेजस्विनी कोल्हापुरे यांनी असंही नमूद केलं की, श्रद्धानं आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे नेला आहे, याचा तिला सार्थ अभिमान वाटतो. त्या पुढे असंही म्हणाल्या की, श्रद्धानं ज्या सहजतेनं आणि शालीनतेनं आपल्या कुटुंबाचं नाव उज्वल केलंय, ते पाहून त्यांना अत्यंत आनंद झालाय.

श्रद्धासोबत मावशी तेजस्विनी कोल्हापुरे यांचं नातं कसं?  (Shraddha Kapoor And Tejaswini Kolhapure)

श्रद्धा कपूरची मावशी, तेजस्विनी कोल्हापुरे यांनी असंही उघड केलंय की, ती आणि श्रद्धा एकमेकींच्या कामावर चर्चा करतात. या दोघी आपापल्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ, तसेच विविध सिनेमांमधील त्यांचे लूक एकमेकींशी शेअर करतात. तेजस्विनीनं पुढे असंही नमूद केलंय की, ती आणि श्रद्धा एकमेकींना सल्ला केवळ तेव्हाच देतात, जेव्हा त्यांना मनापासून असं वाटतं की, एखाद्या गोष्टीमध्ये खरोखरंच सुधारणा करता येऊ शकते.

दरम्यान, श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी यांच्या रिलेशनशिपच्या आणि लग्नाच्या चर्चा गेल्या बऱ्याच काळापासून सुरू आहेत. 2014 पासूनच त्यांच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलेलं. त्यावेळी त्यांना एका 'डिनर डेट'वर एकत्र पाहिलं गेलं होतं. व्हेकेशनपासून ते वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये ही जोडी वारंवार एकत्र दिसून आली. असं असलं तरी, श्रद्धा आणि राहुल यांनी आपल्या नात्याला अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. तरीही, त्यांच्यातील 'केमिस्ट्री' हा आजही चर्चेचा विषय बनलेला आहे. चाहत्यांकडून दोघेही लग्न करणार असून साताजन्माची गाठ बांधणार आहेत, असं सांगितलं जातंय.  श्रद्धासोबत ज्याचं नाव जोडलं जातंय, तो लेखक राहुल मोदी हा नामांकीत लेखक आणि सिनेनिर्माता आहे. श्रद्धाच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास लवकरच ती 'ईथा' (Eetha) या सिनेमात दिसणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

'तिनं अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Jadhav On Daughter Dhriti Affairs: 'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव कोणतेही आढेवेढे न घेता थेटच बोलले
'मला तिचे बॉयफ्रेंड्स आवडत नाहीत, मी तोंडावर...'; लेकीच्या अफेअर्सबाबत दिग्दर्शक संजय जाधव असं का बोलले?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
एक नाही, दोनही नाही... 4000 कोटींच्या 'रामायणम'मध्ये तब्बल 7 भूमिका साकारणार 'महाभारता'तील 'हा' लोकप्रिय अभिनेता; ओळखलं का कोण?
Junior Amitabh Bachchan In Deewaar Movie: 'दीवार'चा ज्युनियर अमिताभ सध्या करतो तरी काय? भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
'दीवार'चा ज्युनियर अमिताभ, भारत सोडून अमेरिकेत थाटलाय कोट्यवधींचा व्यवसाय, टेक इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव; मुली हॉलिवूड स्टार्स, ओळखलं का कोण?
Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lankan Coach News : श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
श्रीलंकेच्या खेळाडूने संघाच्या कोचला संपवलं; पोलिसांकडून क्रिकेटपटूला अटक, टीम इंडियाच्या कसोटी सामन्याआधी खळबळ, नेमकं काय घडलं?
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Embed widget