The Bengal Chapter Teaser :प्रतीक्षा संपली 'द दिल्ली फाईल्स' चित्रपटाचा टिझर आला; मिथून चक्रवर्तींचा वेश पाहून अनेकजण अवाक्!
The Delhi Files : The Bengal Chapter Teaser : द दिल्ली फाईल्स : द बंगाल चॅप्टर या चित्रपटाचे टिझर रिलीज करण्यात आले आहे.
The Delhi Files : The Bengal Chapter Teaser Out : यंदाचे वर्ष बॉलिवुडसाठी विशेष असणार आहे. कारण या वर्षी अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून 'द दिल्ली फाईल्स : द बंगाल चॅप्टर' या चित्रपटाची सगळीकडे चर्चा होती. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार? असे विचारले जात होते. आता मात्र या चित्रपटाची प्रतीक्षा संपली आहे. येत्या 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून प्रजासत्ताकदिनी या चित्रपटाचा टिझर रिलिज करण्यात आला आहे.
टिझरमध्ये नेमकं काय?
प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून द दिल्ली फाईल्स : द बंगाल चॅप्टर या चित्रपटाचा साधारण दोन मिनिटांचा एक टिझर रिलीज करण्यात आला आहे. या टिझरमध्ये दिग्गज अभिनेते मिथून चक्रवर्ती दिसत आहेत. त्यांनी या चित्रपटात एका वृद्ध माणसाची भूमिका साकारल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे या टिझरमध्ये मिथून चक्रवर्ती संविधानाची उद्देशिका म्हणताना दिसत आहेत. त्यामुळे द दिल्ली फाईल्स : द बंगाल चॅप्टर या चित्रपटामध्ये नेमके काय असणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विवेक अग्निहोत्रींचे आधीचे चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
या चित्रपटात मिथून चक्रवर्ती यांनी मुख्य भूमिका साकारलेली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी विवेक अग्निहोत्री यांनी पार पाडली आहे. याआधी त्यांनी द ताश्कंद फाईल, द काश्मीर फाईल, द व्हॅक्सिन वॉर यासारखे चित्रपट दिग्दर्शित केलेले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला होता. सोबतच हे चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची तर तेव्हा चांगलीच चर्चा झाली होती. या चित्रपटात चुकीच्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, असा दावा केला जात होता. मात्र हा चित्रपट अनेक राज्यांत करमुक्त करण्यात आला होता. परिणामी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.
येत्या 15 ऑगस्ट रोजी चित्रपट होणार प्रदर्शित
त्यानंतर आता विवेक अग्निहोत्री यांचा द दिल्ली फाईल्स : द बंगाल चॅप्टर हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात नेमके काय असणार? तसेच चित्रपटात इतर कलाकार कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. येत्या 15 ऑगस्ट 2025 म्हणजेच स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट संपूर्ण भारतभर प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
शाहरुख खानचा नाद खुळा! हातात घातलं तब्बल 76 लाखांचं घड्याळ, फिचर्स वाचून व्हाल थक्क!