Kulhad Pizza Viral Couple : MMS लिक झालेल्या व्हायरल कुल्हड पिझ्झा कपलच्या अडचणी संपेनात, विदेशात गेल्यावर समोर उभं ठाकलं मोठं संकट
Kulhad Pizza Viral Couple : प्रायव्हेट व्हिडीओ लिक झाल्याने कुल्हड पिझ्झा कपल चर्चेत आले होते. त्यांनी आता परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.
Kulhad Pizza Viral Couple : सोशल मीडियावर कुल्हड पिझ्झा कपल नेहमीच चर्चेत असते. त्यांनी उभारलेल्या उद्योगामुळे ते अगदी कमी काळात प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांचा कथित खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळेही ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्यानंतर आता त्यांना येत असलेल्या धमक्यांमुळे थेट भारत देश सोडला आहे. मात्र भारत सोडताच त्यांच्या अडचणी कमी होत नाहीयेत. इंग्लंडमध्ये गेल्यानंतर ते आता नव्या अडचणीत सापडले आहेत.
कुल्हड पिझ्झा कपलच्या अडचणी कमी होईनात
मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या सहज आणि गुरुप्रित कौर या कुल्हड पिझ्झा कपलने आपल्या मुलासह भारत देश सोडला असून ते आता इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहेत. मात्र इंग्लंडला जाऊनही त्यांच्या अडचणी काही कमी होत नाहीयेत. याबाबत सहज अरोराने नुकतेच सोशल मीडियावर सविस्तर सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये सहज अरोरा आणि गुरुप्रित कौर त्यांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याचे सांगत आहेत. इंग्लंडमधील हवामान वेगळे आहे. तिथे थंडी फार असते. त्यामुळेच या कुल्हड पिझ्झा कपलचे मुल आजारी पडले आहे. सुरुवातीला त्यांना या हवामानाशी जुळवून घेण्यात फार अडचण आली. आता मात्र त्यांच्या मुलाची प्रकृती बरी आहे, असं सहज अरोरा या व्हिडीओमध्ये सांगताना दिसतोय.
सहज अरोराचं गाणं येणार
सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज अरोरा आणि गुरुप्रित कौर यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली. आता सहज अरोरा हा गायनाच्या क्षेत्रातही पाऊल ठवतो आहे. त्याचे लवकरच एक गीत प्रदर्शित होणार आहे. या गीताबाबत त्याने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर सांगितलेले आहे. या गाण्याचे काही पोस्टर्सही त्याने शेअर केले आहेत.
View this post on Instagram
कपलचा प्रायव्हेड व्हिडीओ झाला होता लिक
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाल्यानंतर कुल्हड पिझ्झा कपलचा एक प्रायव्हेड व्हिडीओ अचानक व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या कपलने पोलीस ठाण्यात रितसर तक्रारही केली होती. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या कपलवर वेगवेगळ्या स्तरातून टीका झाली होती. त्यानंतर त्यांना मोठ्या मानसिक त्रासातून जावे लागले होते. त्यानंतर आता हे कपल भारत सोडून इंग्लंडमध्ये स्थायिक झाले आहे.
हेही वाचा :
शाहरुख खानचा नाद खुळा! हातात घातलं तब्बल 76 लाखांचं घड्याळ, फिचर्स वाचून व्हाल थक्क!