शाहरुख खानचा नाद खुळा! हातात घातलं तब्बल 76 लाखांचं घड्याळ, फिचर्स वाचून व्हाल थक्क!
Shah Rukh Khan Watch Collection : शाहरुख खान एका कार्यक्रमात अनोखी घडी घालून आला होता. ही घडी तयार करण्यासाठी चक्क सोन्याचा वापर करण्यात आला आहे.
मुंबई : बॉलिवुडचा किंग म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) जगभरात चाहते आहेत. त्याला पाहण्यासाठी तरुणाई अक्षरश: जीवाचं रान करते. अभिनयाच्या जोरावर त्याने लोकांचे प्रेम, संपत्ती असं सगळं मिळवलेलं आहे. त्याच्याकडे आलिशान घर आहे. महागड्या गाड्या आहेत. घरात सर्व महागड्या सुखवस्तू आहेत. शाहरुख खान त्याच्या ड्रेसिंग सेन्समुळेही चांगलाच चर्चेत असतो. शाहरुख खानला घड्यांची फार आवड आहे. तो याआधी अनेक कार्यक्रमांत वेगवेगळ्या घड्या घालून आलेला आहे. त्याच्या या घड्याळांच्या प्रेमाची याआधीही चांगलीच चर्चा झालेली आहे. असं असताना शाहरुख पुन्हा एकदा त्याने मनगटावर लावलेल्या घडीमुळे चर्चेत आला आहे. या घडीची किंमत तब्बल 76 लाख रुपये असल्याचं म्हटलं जातंय.
18 कॅरेट सँड गोल्डचा वापर
शाहरुख खान नुकतेच 2025 सालच्या आयफा अवॉर्ड्सच्या एका प्री-इव्हेंटमध्ये आला होता. त्याच्या येण्यानं या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा झाली. या कार्यक्रमासाठी तो काळ्या रंगाच्या सुट-बुटात आला होता. सोबतच त्यावेळी त्याने मनगटावर अत्यंत आखर्षक असे घड्याळ बांधले होते. याच घडीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. ही घडी ऑडेमार्स पिगुएट या कंपनीची असल्याचं म्हटलं जातंय. शाहरुखने घातलेली घडी ही एक लिमिटेड एडिशन आहे. तब्बल 18 कॅरेट सँड गोल्डचा वापर करून ही घडी तयार करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे जगभरातील फक्त 250 लोकांकडे ही घडी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ऑडेमार्स पिगुएट कंपनीच्या या घडीची किंमत तब्बल 76 लाख 84 हजार 825 हजार रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. त्याची हीच आगळीवेगळी घडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शाहरुख खानकडे अशाच अनेक महागड्या घड्या आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमांत तो या घड्या घालतो.
शाहरुखने घातलेल्या घडीची विशेषता काय?
शाहरुखने आयफा अवॉर्ड्स 2025 च्या प्री-इव्हेंटमध्ये घातलेल्या घडीचे नाव ऑडेमार्स पिगुएट [RE]Master02 असे आहे. या घडीची डिझाईन अगदी दुर्मिळ आणि अनोखी आहे. त्याने घातलेली घडी ही एक लिमिटेड एडिशन आहे. जगभरात फक्त 250 लोकांकडे अशी घडी आहे. ही घडी तयार करताना 18 कॅरेट सँड गोल्ड केस वापरण्यात आली आहे. यामुळे ही घडी प्रकाश आणि घडीच्या हालचालीनुसार तिचा रंग बदलते. या घडाची रंग गुलाबी आणि पांढरा होतो. या घडीचे "Bleu Nuit, Nuage 50" हे डायल पीव्हीडी तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आले आहे. या घडीचे डायल तयार करताना 12 वेगवेगळ्या त्रिकोणी ब्रास प्लेटचा वापर करण्यात आला आहे. या घडीत अल्ट्रा-थिन कॅलिबर 7129 मुव्हमेंट आहे. यामुळे घडी तंतोतंत वेळ सांगते तसेच या घडीच्या बॅटरीचीही कार्यक्षमता वाढते.
View this post on Instagram
राजस्थानमध्ये होणार आयफा अवॉर्ड्स 2025
दरम्यान आयफा 2025 अवॉर्ड्स यावेळी राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित करण्यात येईल. 7 मार्च ते 9 मार्च या काळात हा कार्यक्रम होईल. या काळात बॉलिवुडचे जवळजवळ सगळेच सेलिब्रिटी जयपूरला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी आयफा 2025 अवॉर्ड्सचे सूत्रसंचालन अभिनेता कार्तिक आर्यन आणि शाहरुख खान करणार आहेत.
हेही वाचा :