Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Telly Masala : मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Gurucharan Singh : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला; चौकशीदरम्यान म्हणाला,"दुनियादारी सोडून..."
Gurucharan Singh Latest Update : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) 25 दिवसांनी घरी सुखरुप परतला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता बेपत्ता असल्याचं समोर आलं होतं. अभिनेत्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. गुरुचरण बेपत्ता असल्याने चाहत्यांसह पोलीसदेखील हैराण झाले होते. गुरुचरणचं बरंवाईट तर झालं नसेल ना असाही विचार चाहत्यांच्या मनात येऊन गेला. आपला मुलगा घरी परत यावा यासाठी त्याचे वडीलही प्रार्थना करत होते. अशातच आता 25 दिवसांनी गुरुचरण आपल्या घरी परतला आहे. घरी परतल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान गुरुचरण म्हणाला,"दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो".
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sahara On Scam 2010 Web Series : रिलीज होण्यापूर्वीच हंसल मेहता यांची 'स्कॅम 2010' वेब सीरिज वादात? प्रकरण कोर्टात जाण्याची शक्यता, प्रकरण काय?
Sahara On Scam 2010 Web Series : दिग्दर्शक-निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांनी आपली आगामी वेब सीरिज 'स्कॅम 2010- द सुब्रत रॉय सागा' ची (Scam 2010 Web Series) घोषणा केली. मात्र, ही वेब सीरिज रिलीज होण्यापूर्वीच वादात अडकण्याची शक्यता आहे. ही वेब सीरिज तमल बंदोपाध्याय यांनी लिहिलेल्या 'सहारा: द अनटोल्ड स्टोरी'या पुस्तकावर आधारीत आहे. ही वेब सीरिज दिवंगत व्यावसायिक आणि सहारा ग्रुपचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्या जीवनावर, त्यांच्या घोटाळ्यावर आधारीत असणार आहे. 'स्कॅम 2010' ची घोषणा झाल्यानंतर आता सहारा परिवारने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Bollywood Movie : पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये जमवून बनवला चित्रपट, आता 48 वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार स्पेशल शो; तुम्ही पाहिलाय का चित्रपट?
Bollywood Movie : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' (Cannes Film Festival 2024) हा जगभरातील सेलिब्रिटींसाठी खूपच खास असतो. यंदाचा हा महोत्सव बॉलिवूडसाठी खूपच खास असणार आहे. हिंदी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या 'मंथन' (Manthan) या चित्रपटाचा कान्समध्ये स्पेशल शो ठेवण्यात आला आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलदरम्यान शुक्रवारी Salle Bunuel मध्ये दाखवला जाणार आहे. श्याम बेनेगल (Shyam Benegal) यांच्या यादगार चित्रपटांमध्ये 'मंथन'चा समावेश आहे. चित्रपटात दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांचा शानदार अभिनय पाहायला मिळाला आहे. 'मंथन' हा एकच चित्रपट यंदाच्या कान्सच्या क्लासिक सेक्शनमध्ये निवडला गेला आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Anushka Shetty Wedding News : प्रभाससोबत नाही तर 'या' व्यक्तीसोबत विवाह बंधनात अडकणार अनुष्का शेट्टी? साखरपुडाही झाला...
Anushka Shetty Wedding News : 'बाहुबली' चित्रपटातील देवसेनाम म्हणजे अभिनेत्री अनुष्का शेट्टी (Anushka Shetty) आता विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनुष्का शेट्टी आणि प्रभास (Prabhas) यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा होती. मात्र, प्रभास आणि अनुष्का यांच्या चाहत्यांना धक्का लागणार आहे. अनुष्का ही प्रभाससोबत विवाहबंधनात अडकणार नाही. अनुष्काने ही चित्रपट निर्मात्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघांचाही साखरपुडा झाला असल्याचे वृत्त आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खान लवकरच अडकणार लग्नबंधनात; कोण आहे 'प्रिन्स'?
Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भात अनेक चर्चा होत असतात. सध्या सारा अली खानच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत. सारा अली खान यावर्षात लग्न करू शकते, असा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. अभिनेत्रीच्या लग्नासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत आहे. सारा अली खानचा साखरपुडा झाल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता अभिनेत्रीच्या लग्नाची आणि मिस्ट्री मॅन कोण हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.