Bollywood Actress Life Story: शाहरुख खान, अजय देवगणसोबत झळकलेली 'ही' सुंदर अभिनेत्री, 48व्या वर्षीही अविवाहित; लग्न न करण्याचं कारण सांगताना म्हणाली...
Bollywood Actress Life Story: यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही सुपरस्टार अभिनेत्री अविवाहित आहे. या अभिनेत्रीनं तिच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत.

Bollywood Actress Life Story: सुष्मिता सेन (Sushmita Sen), तनिषा मुखर्जी (Tanisha Mukherjee), शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि तब्बू (Tabu) या बॉलिवूडमधील (Bollywood News) अशा अनेक अभिनेत्री (Actress) आहेत, ज्यांचं वय 40 वर्षांपेक्षा जास्त आहे, पण तरीसुद्धा त्यांनी अद्याप लग्न केलेलं नाही. अशीच एक अभिनेत्री म्हणजे, दिव्या दत्ता. जिनं शाहरुख खानपासून अमिताभ बच्चनपर्यंत अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केलंय. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे आणि बरीच प्रसिद्धी आणि संपत्ती मिळवली आहे. पण, यशाच्या सर्वोच्च शिखरावर असूनही ती अविवाहित आहे. दिव्या दत्तानं तिच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. जाणून घेऊयात तिच्याबद्दल...
दिव्या दत्ताचा जन्म 25 सप्टेंबर 1977 रोजी लुधियाना इथे झाला. तिला चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याची प्रेरणा तिचे मामा दीपक बहरी यांनी दिली होती, जे एक दिग्दर्शक देखील आहेत. तिनं 1994 मध्ये 'इश्क में जीना इश्क में मरना' या तिच्या पहिल्या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात प्रवेश केला आणि आता तिनं सिनेसृष्टीत 31 वर्ष पूर्ण केली आहेत. तिच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत, दिव्यानं तिची प्रत्येक भूमिका जीवंत केली आहे. तिच्या दमदार अभिनयानं स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
48 वर्षांची दिव्या दत्ता अजूनही अविवाहित आहे.
दिव्या दत्तानं आजवर लग्न केलेलं नाही. तिनं स्वतः आतापर्यंत लग्न न करण्याबद्दल एका मुलाखतीत सांगितलेलं तसेच, त्यामागील कारणंही उघड केलेलं. आयएएनएसशी लग्नाबद्दल बोलताना दिव्या दत्ता म्हणालेली की, टॉक्सिक नात्यात राहण्यापेक्षा तिला अविवाहित राहणं पसंत आहे. ती म्हणाली की, "विषारी नात्यात राहण्यापेक्षा अविवाहित राहणं, एकटं राहणं आणि सुंदर जीवन जगणं चांगलं." तसेच, तिनं कबूल केलं की, तिला नेहमीच मेल अटेंशन मिळालंय, पण लग्न हे तिचं एकमेव लक्ष्य कधीच नव्हतं. यश चोप्रा आणि करण जोहरच्या चित्रपटांमध्ये, लग्नानंतर लोक आनंदानं जगतात, पण वास्तविक जीवनात, तुम्हाला अशा जोडीदाराची आवश्यकता असते, जो तुमचं काम समजून घेऊ शकेल किंवा तुम्हाला समजून घेऊ शकेल.
View this post on Instagram
सातव्या वर्षीच पितृछत्र हरपलं
वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी दिव्याच्या डोक्यावरुन वडिलांचं छत्र हरपलं. तिची आई , नलिनी दत्ता, डॉक्टर होत्या. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी एकट्यानं दिव्याला आणि तिच्या भावाला वाढवलं. याबाबत बोलताना दिव्यानं सांगितलेलं की, तिला स्वतःच्या अटींवर आयुष्य जगायला आवडतं आणि तिला जहरदस्तीनं तडजोड करायची नाही. म्हणूनच तिला कोणत्याही दबावाखाली लग्न करायचं नाही.
दिव्या दत्ताच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, तिनं 'मस्ती एक्सप्रेस', 'धाकड़', 'भाग मिल्खा भाग', 'स्लीपिंग पार्टनर', 'बदलापुर', 'छावा', 'शर्माजी की बेटी', 'वीर-जारा', 'स्पेशल 26', 'स्टेनली का डब्बा', 'मोनिका' आणि 'अपने' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंस केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























