एक्स्प्लोर

Anya Singh On Aryan Khan Baads Of Bollywood Series: आर्यन खान नाहीतर, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं दिग्दर्शन कुणी केलंय? अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं...

Anya Singh On Aryan Khan Baads Of Bollywood Series: खरंच आर्यन खाननं ही सीरिज दिग्दर्शित केली आहे का? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. यावरच आता आर्यन खानच्या सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री आन्या सिंहनं प्रतिक्रिया दिली आहे. 

Anya Singh On Aryan Khan Baads Of Bollywood Series: बॉलिवूडचा (Bollywood News) किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खाननं (Aryan Khan) नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, आपल्या वडिलांप्रमाणे अभिनेता म्हणून नाहीतर दिग्दर्शक म्हणून. आर्यन खाननं आपलं करिअर म्हणून वडिलांची इंडस्ट्री निवडली. पण, अभिनयाऐवजी दिग्दर्शनाची निवड केली. त्यानं दिग्दर्शित केलेली 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' (Bads Of Bollywood) नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित करण्यात आली. चाहत्यांनासुद्धा आर्यन खानची सीरिज खूप आवडली. पण, काही काळातच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. खरंच आर्यन खाननं ही सीरिज दिग्दर्शित केली आहे का? असे प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. यावरच आता आर्यन खानच्या सीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री आन्या सिंहनं (Anya Singh) प्रतिक्रिया दिली आहे. 

आन्या सिंहनं आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये लक्ष्यच्या मॅनेजरची भूमिका साकारली आहे. आर्यनच्या दिग्दर्शनावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांबाबत बोलताना ती म्हणाली की, "मला वाटतं इतरांना खाली खेचण्यासाठी लोकांना फक्त एक संधी हवी असते. आर्यन कौतुकासाठी पात्र आहे, कारण त्यानं खरोखरंच सुंदर काम केलं आहे. त्यानं या प्रोजेक्टवर खूप मेहनत घेतलीय. सकाळी 7 पासून ते रात्री 11 पर्यंत त्याची एनर्जी कधीच कमी झाली नाही. तुम्ही त्याला कधीही थकलेलंही पाहणार नाही. त्याच्या चेहऱ्यावर कायमच स्माईल असते आणि कामावर लक्ष केंद्रीत असतं..."  

'हिंदुस्तान टाईम्स'शी बोलताना आन्या सिंह म्हणाली की, "आर्यनला हवं असतं तर, त्यानं टेक्निशियनची फौजच आजूबाजूला ठेवली असती. पण त्यानं स्वत:ची एक टीम बनवली, ज्यात त्यानं तरुण, टॅलेंटेड अशा लेखक आणि डीओपींना संधी दिली. लोक बोलणार हे त्यालाही माहीत होतं आणि त्याच्या व्हिजनवर कोणी प्रश्न उपस्थित करू नये, अशी त्याची इच्छा होती. मी त्याचा खूप आदर करते..."

View this post on Instagram
 
A post shared by Netflix India (@netflix_in)

दरम्यान आर्यन खाननं 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'सीरिजचं लेखन आणि दिग्दर्शन दोन्ही केलं आहे. तसेच, त्यानं या सीरिजचे संवादही स्वतः लिहिले आहेत. तसेच,  बिलाल सिद्दीकी आणि मानव चौहान यांनी आर्यनसोबत सहाय्यक लेखक आणि क्रिएटर्स म्हणून काम केलं आहे. सीरिजचा क्लायमॅक्स तर अगदीच अनपेक्षित आहे. याशिवाय आर्यननं आपल्या पहिल्याच सीरिजमध्ये अनेक दिग्गजांचे कॅमिओ घेतले आहेत. शाहरुख, सलमान आणि आमिर तिघांचेही वेगवेगळे कॅमिओ आहेत. राजामौली, करण जोहर, अर्शद वारसीही आहेत. तर लक्ष्य लालवानी, राघव जुयाल, सेहर बंबा, आन्या सिंह, मनोज पाहवा, मोना सिंह आणि बॉबी देओल हे मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आर्यन खानच्या ‘वेब’ सीरिजमधील रणबीर कपूरचा 'झुरका' वादाच्या भोवऱ्यात, मानवाधिकार आयोगाचा आक्षेप, नक्की प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget