शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे; पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्हा काँग्रेस, भारती विद्यापीठाकडून मदत करणार; आमदार विश्वजित कदमांची ग्वाही
सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी (Sangli District Congress relief) आणि भारती विद्यापीठाकडून (Bharati University flood assistance) मदत दिली दिली जाईल असेही कदम म्हणाले.

MLA Vishwajeet Kadam assures help: महाराष्ट्रातील (Marathwada Flood 2025) आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी सुकर व्हावी म्हणून राज्य सरकारने आता शेतकऱ्यांची कर्जमाफी (Farmer loan waiver demand) जाहीर करायलाच पाहिजे आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत सरकारने दिलीच पाहिजे, असे काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील पूरग्रस्तासाठी देखील सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी (Sangli District Congress relief) आणि भारती विद्यापीठाकडून (Bharati University flood assistance) मदत दिली दिली जाईल असेही कदम म्हणाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी, पूरग्रस्तांना मदत अशा राज्यातील अनेक प्रश्नांवरून रस्त्यावरची लढाई करण्याची वेळ आली तर काँग्रेस या प्रश्नावरून रस्त्यावर उतरेल, असा इशाराही आमदार डॉ. विश्वजित कदम MLA Vishwajeet Kadam assures help यांनी दिला.
आमदार सतेज पाटील यांचे आवाहन
दरम्यान, मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने कोल्हापूरकरांना केले आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करुया हा मदतीचा संकल्प काँग्रेसने केला आहे. त्यासाठी किराणा सामान, प्रथमोचार साहित्य, सॅनिटरी पॅडस, चप्पल, स्लीपर्स, पाणी बॉटल्स, पुरुष, महिला, लहान मुलांचे कपडे, ब्लँकेटस, चटई, रेनकोट, टॉवेल्स व शालेय साहित्य देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवार पासून ते 28 सप्टेंबरपर्यंत ही मदत जिल्हा काँग्रेस कमिटीत जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर 29 सप्टेंबरला ट्रकद्वारे ही मदत मराठवाड्यातील पूरग्रस्त विविध जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात येणार आहे. कोल्हापुरकरांनी महापुराचा वेदनादायक अनुभव घेतला आहे. महापुराच्या काळात देशभरातून मदतीचा हात मिळाला होता. त्यामुळे आता दातृत्व करण्याची आपली वेळ आहे. ही आपली जबाबदारी असून ही तुमची छोटीशी मदतही पुरग्रस्तांसाठी जीवनरेखा ठरेल. मराठवाडा पुन्हा नव्याने उभा राहण्यासाठी त्यांना मदतीचा हात पुढे करूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















