Telly Masala : अक्षय कुमारने केला मेट्रोने प्रवास ते शाहरुखला करायचंय मणिरत्नमसोबत काम; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Shah Rukh Khan : शाहरुखला करायचंय मणिरत्नमसोबत काम; म्हणाला,"ट्रेन काय विमानावरही 'छैया छैया'वर थिरकेल"
Shah Rukh Khan on Woring With Maniratnam : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. 'पठाण' (Pathaan) सिनेमाच्या माध्यमातून किंग खानने 2023 मध्ये धमाकेदार कमबॅक केलं. गतवर्षातील त्याचे 'पठाण','जवान' आणि 'डंकी' हे तिन्ही सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. अशातच आता नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात शाहरुखने दाक्षिणात्य सुपरस्टार मणिरत्नमसोबत (Mani Ratnam) काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Akshay Kumar : चेहऱ्यावर मास्क अन् डोक्यावर टोपी, अक्षय कुमारने मुंबई मेट्रोने केला प्रवास; पाहा PHOTO
Akshay Kumar Metro Ride : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अनेकदा तो त्याच्या अभिनयामुळे आणि बॅक टू बॅक सुपरहिट होणाऱ्या सिनेमांमुळे चर्चेत असतो. अशातच अक्षयने आता मुंबई मेट्रोने प्रवास केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Annapoorani Controversy : "राम मांसाहारी होता" डायलॉगमुळे 'अन्नपूर्णी' अडकला वादाच्या भोवऱ्यात; सिनेमातील कलाकारांविरोधात तक्रार दाखल
Annapoorani Controversy : 'अन्नपूर्णी' (Annapoorani) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. एकीकडे या कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. सिनेमातील काही डायलॉगमुळे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली. त्यानंतर नेटफ्लिक्सने हा सिनेमा हटवण्याचा निर्णय घेतला. अशातच आता या सिनेमातील कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kalki 2898 AD New Release Date : प्रभासच्या 'कल्कि 2898 एडी'ची रिलीज डेट जाहीर! 'सालार'नंतर पुन्हा गाजवणार बॉक्स ऑफिस
Prabhas Kalki 2898 AD to Release on this Date : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या 'सालार' (Salaar) या सिनेमामुळे चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर दिवसेंदिवस हा सिनेमा दणदणीत कमाई करत आहे. या सिनेमानंतर प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Tejaswini Pandit : जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय... 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' सिनेमात तेजस्विनी पंडित साकारणार राजमाता जिजाऊंची भूमिका
Tejaswini Pandit New Movie Swarajya Kanika Jijau : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील अभ्यासू अभिनेत्री आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेनं तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. तेजस्विनीचा 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' (Swarajya Kanika Jijau) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तेजस्विनी जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तेजस्विनीचा या सिनेमातील लूक आऊट करण्यात आला आहे.