ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024
ही बातमी पण वाचा
Santosh Deshmukh Case: आरोपींचं आदल्यादिवशी तिरंगा हॉटेलवर जेवण, संतोष देशमुखांच्या हत्येचा कट कसा रचला? सर्वात मोठा खुलासा
Santosh Deshmukh Case बीड : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येताना दिसत आहे. या हत्याप्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात येत आहे. अशातच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) आता आणखी एक नवी माहिती पुढे आली आहे. संतोष देशमुख यांची हत्या होण्यापूर्वी एक दिवस आधी घटनेतील आरोपींनी बीड-अंबाजोगाई (Beed Ambajogai) महामार्गावरील तिरंगा हॉटेलवर जेवण केल्याचं तपासात समोर आले आहे. त्यामुळे याच हॉटेलवर देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याची संशय व्यक्त करत पोलिसांनी त्या दिशेनं तपास सुरू केल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी, तपास यंत्रणेने हॉटेल मालकाची चौकशी करून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे.
हत्येच्या आदल्या दिवशी आरोपींचे तिरंगा हॉटेलवर जेवण
सरपंच देशमुख यांची हत्या 9 डिसेंबर रोजी झाली. हत्येच्या आदल्या दिवशी आठ डिसेंबर रोजी घटनेतील आरोपींनी याच तिरंगा हॉटेलवर जेवण केले होते. त्यानंतर आरोपी केजच्या दिशेने रवाना झाले. या प्रकरणात तपास यंत्रणेकडून प्रत्येक गोष्टीची तपासणी आणि चौकशी सुरू आहे. अशातच आरोपींची ही माहिती मिळाल्यानंतर सीआयडी आणि एसआयटीच्या टीमने या ठिकाणी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य केल्याचे हॉटेल मालका बाबुराव शेळके यांनी सांगितले आहे.