Annapoorani Controversy : "राम मांसाहारी होता" डायलॉगमुळे 'अन्नपूर्णी' अडकला वादाच्या भोवऱ्यात; सिनेमातील कलाकारांविरोधात तक्रार दाखल
Annapoorani : 'अन्नपूर्णी' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून त्यातील डायलॉगमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता या सिनेमातील कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Annapoorani Controversy : 'अन्नपूर्णी' (Annapoorani) हा सिनेमा रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. एकीकडे या कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. सिनेमातील काही डायलॉगमुळे या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली. त्यानंतर नेटफ्लिक्सने हा सिनेमा हटवण्याचा निर्णय घेतला. अशातच आता या सिनेमातील कलाकारांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
'अन्नपूर्णी' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता. आता या सिनेमातील कलाकारांवर मीरा रोड येथील नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंदू संघटनेचे कार्यकर्ते अरुप मुखर्जी यांनी सिनेमातील कलाकारांविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
'अन्नपूर्णी' सिनेमात हिंदू समाजाच्या धार्मिक भावना भडकवणारी दृश्य आणि वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप अरुप मुखर्जी यांनी दाखल केलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. इतिहासाचा कोणताही पुरावा सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्याकडे नसताना त्यांनी हिंदू देवी देवता यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सिनेमात केलं आहे. तसेच लव जिहाद हा विषय मुद्दाम सिनेमात दाखवल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.
View this post on Instagram
'अन्नपूर्णी'च्या टीमवर गुन्हा दाखल
'अन्नपूर्णी' सिनेमामुळे सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. 'अन्नपूर्णी' या सिनेमाचे दिग्दर्शक निलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा, अभिनेता जय साठयाराज, निर्माता जतीन सेठी, आर रवींद्रन, पुनीत गोयंका तसेच झी स्टुडिओचे चिफ बिझनेस ऑफिसर शारिक पटेल, ट्रेन्डेन्ट आर्ट, तसेच नेटफ्लिक्स इंडीया हेड मोनिका शेरगील यांच्याविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 153 अ, 295 अ, 505-2, आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अजून कुणालाही अटक करण्यात आली नाही.
त्याचबरोबर सखल हिंदू समाजाचे कार्यकर्ते इतर पोलीस ठाण्यातही लेखी तक्रार करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
देशात राममय वातावरण निर्माण झालेलं असताना 'अन्नपूर्णी' या सिनेमात रामाचा अपमान करण्यात आला आहे. "राम मांसाहारी होता" असा डायलॉग या सिनेमात होता. या डायलॉगमुळे हिंदी धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारे अनेक सीन या सिनेमात होते. एकंदरीतच या सिनेमातील वादग्रस्त संवाद आणि दृश्यांवर आक्षेप घेतला जात आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. पण आता हा सिनेमा काढून टाकण्यात आला आहे.
संबंधित बातम्या
Annapoorani Controversy: 'अन्नपूर्णी' चित्रपटातील 'त्या' डायलॉगमुळे झालेल्या वादानंतर नेटफ्लिक्सनं उचललं मोठं पाऊल, थेट...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
