एक्स्प्लोर

Tejaswini Pandit : जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय... 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' सिनेमात तेजस्विनी पंडित साकारणार राजमाता जिजाऊंची भूमिका

Tejaswini Pandit : अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तेजस्विनीचा सिनेमातील लूक आऊट करण्यात आला आहे.

Tejaswini Pandit New Movie Swarajya Kanika Jijau : अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील अभ्यासू अभिनेत्री आहे. आपल्या प्रत्येक भूमिकेनं तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत. गेल्या काही दिवसांपासून चाहते तिच्या आगामी सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. तेजस्विनीचा 'स्वराज्य कनिका - जिजाऊ' (Swarajya Kanika Jijau) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तेजस्विनी जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. आज राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त तेजस्विनीचा या सिनेमातील लूक आऊट करण्यात आला आहे.

तेजस्विनी पंडित साकारणार 'स्वराज्य कनिका-जिजाऊं'ची भूमिका

राष्ट्रमाता, राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले... यांनी हिंदवी स्वराज्याची पायाभरणी करून या मुलुखाला छत्रपती शिवाजी महाराज दिले .बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, शौर्य, दूरदृष्टी, कुशल राजनिती, कुटुंबवत्सल असे सगळेच गुण त्यांच्यात होते. शिवबाचे शिवराय घडवताना या माऊलीने अनेक वादळं पेलली पण या वादळात ही तेजस्वी ज्योत आणखी प्रखर झाली. प्रत्येक कसोटीवर खऱ्या उतरून या माऊलीने स्त्रीशक्ती व मातृशक्तिचे चिरंतन उदाहरण आपल्या सर्वांस दिले. 

तेजस्विनी पंडित साकारणार जिजाऊंची भूमिका

जगाला दिशा देणाऱ्या या जगत्जननीच्या आयुष्यावर आधारित 'स्वराज्य कनिका जिजाऊ' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून या सिनेमात जिजाऊंची भूमिका तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) साकारणार आहे. या सिनेमाचे पोस्टर झळकले असून राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा यात दिसत आहे. या सिनेमाचे लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by 6 Fireflies Producttions (@6firefliesproducttions)

'स्वराज्य कनिका जिजाऊ' या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणाले,"राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता" राजमाता जिजाऊसाहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची-सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहेत . हा अभिमान व जाणीव उराशी बाळगून वीरकन्या ते वीरमातेच्या जीवनकाळचे कथानक दोन-अडीच तासात मांडणे एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होते . जिजाऊसाहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे. जिजाऊसाहेबांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व ,त्यांच्या आयुष्यातील न उलगडलेले प्रसंग-घटना आम्ही प्रेकक्षकांना दाखवणार आहोत". 

जिजाऊंच्या भूमिकेसाठी तेजस्विनीची निवड का?

अनुजा देशपांडे पुढे म्हणाल्या,"एक युगपुरुष घडविणाऱ्या या विलक्षण वात्सल्यमुर्तीला मानाचा मुजरा व साष्टांग प्रणिपात. जिजाऊसाहेबांचे व्यक्तिमत्व अभ्यासत /लिहित असताना माझ्या डोक्यात सारखा विचार असायचा की, ही असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती . तेजस्वीनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच शिवाय एक व्यक्ति म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक व सहाय्यक आहे. तिच्या कामाप्रती ती खूप समर्पित व प्रामाणिक आहे. जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो. मला पूर्ण खात्री आहे ती जिजाऊसाहेबांची भूमिका अगदी चोखपणे साकारेल". 

विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच : तेजस्विनी पंडित

तेजस्विनी पंडित आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हणाली,"ज्या स्त्रीने गुलामगिरीच्या काळोखात जखडलेल्या हिंद प्रांताला स्वतंत्र राज्य - स्वराज्य मिळावे हे स्वप्न पहिल्यांदा पाहिले, त्यासाठी वर्षानुवर्ष त्या झिजल्या, त्या भूमिकेवर अटल राहिल्या. कुठलीही गोष्ट प्रवाहाच्या विरोधात जाऊन करणे म्हणजेच क्रांती होय. अशा राजमाता स्वराज्य जननी जिजाऊसाहेबांची भूमिका करायला माझी निवड केली याबद्दल मी अनुजा ताईंची शतशः आभारी आहे. ही भूमिका करायला मिळणं ही निश्चितच आनंदाची बाब आहे. मात्र त्याहून जास्त जबाबदारी आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला, त्यांना घडवले ती माऊली स्वतः निश्चितच त्याच ताकदीची, पराक्रमी, अत्यंत कुशल राजनैतिक आणि मुख्य म्हणजे दूर दृष्टीची असणार यात कसलेच दुमत नाही .अशा या विलक्षण वीरमातेला पडद्यावर साकारणे हे माझे अहोभाग्यच".

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 11 March 2025Sandeep Kshirsagar Viral Audio Clip | मारहाणीचा विषय दीड वर्षांपूर्वीचा, संदीप क्षीरसागर यांचं स्पष्टीकरणABP Majha Headlines : 3 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 March 2025 : Maharashtra News : ABP MajhaAjay Munde PC Beed : धनंजय मुंडेंचा भाऊ मैदानात, अजय मुंडे यांचे Suresh Dhas यांच्यावर टीकास्त्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
छत्रपती शिवराय, संभाजीराजेंचा अपमान करणारा, इंद्रजित सावतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या; 24 तासांत कोल्हापूर पोलिसांसमोर सरेंडर होणार?
Pakistan Train Hijack मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
मोठी बातमी ! पाकिस्तानमध्ये 'जाफर एक्सप्रेस हायजॅक'; 6 जवानांना मारलं, ट्रेनमधील 120 प्रवासी ओलीस
गुड न्यूज, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी 11 महिने, नवा जीआर प्रसिद्ध, एक लाख युवकांना फायदा 
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
Yamaha कडून भारतातील पहिली हायब्रीड बाईक FZ-S Fi Hybrid लाँच, किंमत अन् फीचर्स काय? जाणून घ्या डिटेल्स
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
धक्कादायक! नशा करण्यासाठी आईने पैसे न दिल्याने युवकाने 13 दुचाकी जाळल्या; पुण्यात तरुणाईची व्यसनाधिनता
Nashik Bajar Samiti : नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!
नाशिक बाजार समितीच्या सभापतींविरोधात अविश्वास ठराव मंजूर, चुंभळेंची खेळी यशस्वी, पिंगळेंची सत्ता उलथवली!
Mumbai Nagpur Highway Accident: आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
आधी दुचाकीस्वाराला उडवले, स्कॉर्पिओचे नियंत्रण सुटून गाडी जनरल स्टोअर्समध्ये घुसली, अपघाताचा थरार CCTVत कैद
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
धक्कादायक! पुण्यातील डीवाय पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब? डॉगस्कॉडसह बीडीएसपथक दाखल; विद्यार्थी वर्गाबाहेर
Embed widget