Telly Masala : सचिन गोस्वामींचा सुरेश वाडकरांना टोला ते दिवंगत सिद्धू मुसेवालाची आई गरोदर, घरी येणार नवा पाहुणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
![Telly Masala : सचिन गोस्वामींचा सुरेश वाडकरांना टोला ते दिवंगत सिद्धू मुसेवालाची आई गरोदर, घरी येणार नवा पाहुणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या telly masala marathi movie marathi serial latest update Sachin Goswami critize to Suresh Wadkar Ravi Kishan on Animal movie Alpha male Sidhu Moose Wala mother pregnant Telly Masala : सचिन गोस्वामींचा सुरेश वाडकरांना टोला ते दिवंगत सिद्धू मुसेवालाची आई गरोदर, घरी येणार नवा पाहुणा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/27/890b05a3b7a9abb2a9993d59865d2c631709027185560290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Sachin Goswami On Suresh Wadkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींचा सुरेश वाडकरांना टोला, तुजं नमो गायक...
Sachin Goswami On Suresh Wadkar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे लेखक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांना टोला लगावला आहे. आपल्या सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी वाडकरांवर उपरोधिक टीका केली आहे. सुरेश वाडकर यांनी सोमवारी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींबाबत आणि राजकीय स्थितीबाबत केलेल्या वक्तव्यावरून गोस्वामी यांनी वाडकरांना टोला लगावला.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
बधाई हो! सिद्धू मुसेवालाची आई चरण कौर गरोदर, घरी येणार नवा पाहुणा
Sidhu Moose Wala : दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moose Wala) अर्थात शुभदीप सिंग सिद्धू यांची आई गरोदर असल्याचे वृत्त आहे. एका वृत्तानुसार, मुसेवाला कुटुंब लवकरच आपल्या घरात नव्या पाहुण्याचे स्वागत करणार आहे. कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिले आहे. मुसेवालाची आई चरण कौर गरोदर असून लवकरच एक नवीन सदस्य त्यांच्या कुटुंबात सामील होणार असल्याचे वृत्तात सांगण्यात आले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Prabhas House Rent : कोट्यवधींची संपत्ती, पण नव्या शहरात मात्र भाड्यानं राहणार 'बाहुबली'; एका दिवसाचं भाडं किती?
Prabhas London House Rent : दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या बहुप्रतिक्षीत चित्रपट आ 'कल्की 2898 AD' मुळे (Kalki 2898 AD) चर्चेत आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लंडनमध्ये सुरू आहे. त्यामुळे सुपरस्टार प्रभासने लंडनमध्ये एक घर भाडे तत्वावर घेतले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर आराम करण्यासाठी प्रभास या घरात येतो.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Sobhita Dhulipala : हजार वेळा ऑडिशन, स्किन टोनमुळे रिजेक्ट; 'या' अभिनेत्रीनं दिला 800 कोटींचा ब्लॉकबस्टर, आता हॉलिवूडमध्ये दाखवणार जलवा
Sobhita Dhulipala Debut in Hollywood : कोणत्याही वशिल्याशिवाय बॉलीवूडमध्ये (Bollywood) काम मिळवणे आणि नंतर आपला ठसा उमटवणे हे आऊटसाइडर अर्थात 'बाहेर'च्या लोकांना सोपे नसते. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी गॉडफादर, सेलिब्रेटी नसतो. मात्र, कोणतीही पार्श्वभूमी नसताना अनेक कलाकारांनी आपले स्थान निर्माण केले आहे. जवळपास एक हजार वेळा ऑडिशन दिले पण स्कीन टोनमुळे तिला नकार देण्यात आला. मात्र, तिने आपल्या अभिनयाची छाप सोडली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Ravi Kishan On Animal : 'अॅनिमल' चित्रपटावर रवी किशनचा बोचरा वार, अल्फा मेलवाल्यांना त्यांच्या पत्नी तर...
Ravi Kishan On Animal : विविध मुद्यांवर बेधडक वक्तव्य करण्यासाठी अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) ओळखला जातो. त्यामुळे अनेकदा रवी किशन विनाकारण वादात, चर्चेत अडकतो. आता पुन्हा एकदा रवी किशन चर्चेत आला आहे. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या संदीप रेड्डी वंगा (Sandeep Reddy Vanga) दिग्दर्शित 'ॲनिमल' या (Animal Movie) चित्रपटाची आजही बरीच चर्चा होत आहे. आता रवी किशन 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या चित्रपटात दिसणार आहे. रवी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. दरम्यान, रवीने रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटातील त्याच्या अल्फा मेल व्यक्तिरेखेवर टीका केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)