एक्स्प्लोर

Telly Masala : दीपिका-रणवीर होणार आईबाबा ते मार्च महिन्यात प्रदर्शित होणार थ्रिलरपट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Deepika Padukone : 'दीपवीर'च्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा; रणवीरने सांगितली डिलिव्हरी डेट

Deepika Padukone : दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच गूड न्युज देणार आहेत, अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. बॉलीवूडमध्ये सर्वत्र चर्चेत असलेल्या बातमीला आता पूर्णविराम मिळाला आहे, या बातम्यांवर दीपिका आणि रणवीरने शिक्कामोर्तब केला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण लवकरच आई होणार असल्याची माहिती जोडप्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे सर्वांसोबत शेअर केली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी रिहाना जामनगरमध्ये दाखल; अंबानींकडून ग्रँड वेलकम, पाहा व्हिडीओ

Rihanna Team Arrived At Jamnagar:  अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला  (Anant Ambani Radhika Merchant Pre Wedding Function) धमाकेदार सुरुवात झाली आहे. या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक मोठे स्टार्स सहभागी होणार आहेत. अनेक सेलिब्रेटींनी आता जामनगरमध्ये (Jamnagar) येण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकन पॉप सिंगर रिहाना (Pop Singer Rihanna) ही आपल्या टीमसोबत जामनगरमध्ये दाखल झाली आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Sai Tamhankar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून मी ब्रेक घेणार नाही; सईने 'त्या' पोस्टबाबत नेमकं काय सांगितले?

Sai Tamhankar :  अभिनेत्री सई ताम्हणकरची (Sai Tamhankar) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मोठ्या पडद्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सईने आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवले  आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमात सई ताम्हणकर ही हास्यरसिक म्हणून हजेरी लावते. स्किटमध्ये सईकडे पाहूनही अनेकदा विनोदी  पंचेस् असतात. आता, सई ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ब्रेक घेणार का अशी चर्चा रंगली आहे. मात्र, सईने ही चर्चा फेटाळून लावली आहे. आपण MHJ मधून ब्रेक घेत नसल्याचे तिने म्हटले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Fighter OTT Release : दीपिका-हृतिक रोशनच्या 'फायटर'ची मोठी डील; जाणून घ्या कोणत्या OTT कधी होणार रिलीज?

Fighter OTT Release :  'मल्टिस्टारर' 'फायटर' (Fighter Movie) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. मागील महिनाभरापासून फायटरने बॉक्सने सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली. 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने देशातच 211 कोटींचे उत्पन्न मिळवले. तर, वर्ल्डवाईड कमाईचा आकडा 336 कोटी रुपये इतका आहे. मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता 'फायटर' चित्रपट ओटीटीवर रिलीज (Fighter OTT Release) होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Kiran Mane on Ashok Saraf : 'किरण्या, हल्ली तू तलवारच उपसलीयस'; अशोक सराफ-किरण मानेंच्या भेटीत चर्चा काय?

Kiran Mane on Ashok Saraf : मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव ठाकरे गटात (Shiv Sena Uddhav Thackeray) प्रवेश केला. रोखठोक मते मांडणारे किरण माने नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता नुकतीच त्यांनी महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांची भेट घेतली आहे. पोस्ट शेअर करत 'आज दिन बन गया' असं ते म्हणाले आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Movies Release In March 2024 : मार्च महिन्यात सिनेरसिकांना थ्रिलरपटाची मेजवानी; आठ चित्रपट होणार प्रदर्शित

Movies Release In March 2024 :  मार्च महिना सिनेरसिकांसाठी खास असणार आहे. मार्च महिन्यात 8 चित्रपट प्रदर्शित (Movies List Release In March 2024) होणार आहेत. मार्च महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून ते महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारपर्यंत सिनेरसिकांना थ्रिलरपटासह वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा पर्याय असणार आहे. मार्च महिन्याची सुरुवात किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'ने होणार आहे. महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन यांच्या 'क्रू' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
Embed widget