(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sai Tamhankar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून मी ब्रेक घेणार नाही; सईने 'त्या' पोस्टबाबत नेमकं काय सांगितले?
Sai Tamhankar Latest News : अभिनेत्री सई ताम्हणकर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून ब्रेक घेणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, या चर्चा सईने फेटाळून लावल्या आहेत.
Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरची (Sai Tamhankar) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मोठ्या पडद्यापासून ओटीटी प्लॅटफॉर्मवरही सईने आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवले आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी मालिका 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) कार्यक्रमात सई ताम्हणकर ही हास्यरसिक म्हणून हजेरी लावते. स्किटमध्ये सईकडे पाहूनही अनेकदा विनोदी पंचेस् असतात. आता, सई ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ब्रेक घेणार का अशी चर्चा रंगली आहे. मात्र, सईने ही चर्चा फेटाळून लावली आहे. आपण MHJ मधून ब्रेक घेत नसल्याचे तिने म्हटले.
सईच्या ब्रेकची चर्चा का रंगली?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ब्रेक घेत असल्याचे संकेत सईने दिले असल्याची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सईने आपण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' बाबत लिहिले आहे. सईने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, महाराष्ट्राची हास्यजत्रामधील खास भाग कोणता हे तुम्हाला माहित आहे का? त्या खुर्चीत बसून आहे तसं वागता येते. या शोची शूटिंग मिस करत असल्याचे सईने म्हटले. त्यामुळे सई ब्रेक घेणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, सईने चर्चा फेटाळून लावली.
View this post on Instagram
सई खरंच ब्रेक घेतेय का?
सई ताम्हणकर नुकतीच भक्षक या चित्रपटात झळकली होती. त्यानंतर आता आणखी एका वेब शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. मात्र, हा वेब शो मराठी आहे की हिंदी आहे, याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. सईने या सोशल मीडियावरील पोस्टमुळे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून ब्रेक घेत असल्याची चर्चा होते. मात्र, सईला महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोची खूप आठवण येत आहे. सई ओटीटी वरील वेब शोच्या मालिकेच्या चित्रीकरणात व्यस्त असली तरी तिला MHJ च्या सेटची आठवण येत आहे. त्यातूनच तिने ही पोस्ट केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
View this post on Instagram
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा विनोदी कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या शोमधील कलाकारांची महाराष्ट्रात नव्याने क्रेझ निर्माण झाली आहे. दमदार स्किट, चांगला अभिनय, विनोदाची अचूक टायमिंग यामुळे शो लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम शनिवार-रविवारी रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर प्रसारीत होतो.
View this post on Instagram