Taapsee Pannu : '... म्हणून मला कॉफी विथ करणमध्ये बोलवलं नसेल'; तापसी पन्नूनं सांगितलं 'हे' कारण
एका मुलाखतीमध्ये तापसीला कॉफी विथ करणबाबत (Koffee With Karan) विचारण्यात आलं. त्या प्रश्नाला तापसीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.
![Taapsee Pannu : '... म्हणून मला कॉफी विथ करणमध्ये बोलवलं नसेल'; तापसी पन्नूनं सांगितलं 'हे' कारण taapsee pannu epic reply on not appearing in koffee with karan 7 Taapsee Pannu : '... म्हणून मला कॉफी विथ करणमध्ये बोलवलं नसेल'; तापसी पन्नूनं सांगितलं 'हे' कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/08/b411af2fed3ffc749edb0e56d95331f31659934447_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Taapsee Pannu : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ही तिच्या दिलखुलास वक्तव्यांमुळे चर्चेत असते. अनेक वेळा ती लोकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर भन्नाट आणि मजेशीर पद्धतीनं देते. तापसीच्या 'थप्पड' या चित्रपटातील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच तापसीचा दोबारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे तापसी सध्या प्रमोशन करत आहे. एका मुलाखतीमध्ये तापसीला कॉफी विथ करणबाबत (Koffee With Karan) विचारण्यात आलं. त्या प्रश्नाला तापसीनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधलं.
मुलाखतीमध्ये तापसीला विचारण्यात आलं की, 'कॉफी विथ करणमध्ये तुला का बोलवण्यात येतं नाही?' यावर तापसीनं उत्तर दिलं, 'कदाचित माझी सेक्स लाईफ एवढी इंटरेस्टिंग नाहीये. त्यामुळे मला ते बोलवत नसतील.' कॉफी विथ करणच्या सातव्या सिझनमध्ये अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या सेक्स लाईफबाबत सांगितलं होतं. या कार्यक्रमामध्ये आलेले सेलिब्रिटी त्यांच्या वैयक्कित आयुष्याबाबत शोमध्ये सांगतात.
अभिनेत्री तापसी पन्नूनं दोबारा या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे. शोभा कपूर आणि एकता कपूर आणि सुनीर खेतरपाल, गौरव बोस (एथेना) यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तापसीचा ब्लर हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
वाचा इतर बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)