Swapnil Joshi: स्वप्निल जोशीनं ट्वीट करताना चुकवले तीन शब्द; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, 'म्हणे मी पुण्याचा'
सध्या स्वप्निल (Swapnil Joshi) हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. स्वप्निलनं ट्वीट शेअर करुन वेड या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं.
Swapnil Joshi: मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) हा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. दुनियादारी (Duniyadari), तू ही रे (Tu Hi Re),मुंबई-पुणे-मुंबई (Mumbai-Pune-Mumbai) यांसारख्या चित्रपटांमध्ये स्वप्निलनं काम केलं. स्वप्निल त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो. स्वप्निलचा वाळवी हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती आहे. सध्या स्वप्निल हा त्याच्या एका ट्वीटमुळे चर्चेत आहे. स्वप्निलनं ट्वीट शेअर करुन वेड या चित्रपटाच्या टीमचं कौतुक केलं. पण या ट्वीटमधील तीन शब्द त्यानं चुकवले. आता या ट्वीटमुळे सध्या त्याला नेटकरी ट्रोल करत आहेत.
स्वप्निलचं ट्वीट
स्वप्निलनं ट्वीटमध्ये लिहिलं, 'वेड आज बॉक्स ऑफिसवर 50 कोटीचा गल्ला पार करेल. केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन रितेश भाऊ, जिनिलिया
वैनी आणि पूर्ण टीम!'
“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल !
— Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी (@swwapniljoshi) January 18, 2023
केवळ क. मा. ल. कामगिरी !
मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन @Riteishd भाऊ, @geneliad वैनी आणि पूर्ण टीम!
नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
स्वप्निलच्या या ट्वीटमधील पाउल , पाढते आणि वैनी या शब्दांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. स्वप्निलच्या ट्वीटला एका नेटकऱ्यानं रिप्लाय केला, अरे कसली भाषा तुमची.. वहिनी, असं असतं ते.. म्हणे मी पुण्याचा..' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'जिनिलिया वहिनी नॉट वैनी रे, म्हणून मराठीत बोला ,आणि मराठी SRKहे बालिश ढोंग करू नका,' 'मराठी व्यवस्थित लिहा जोशी आधी, पाढते? वैनी? पाउल?' अशी कमेंट देखील एका नेटकऱ्यानं केली.
@geneliad वहिनी not वैनी रे, म्हणून मराठीत बोला ,आणि मराठी SRK cha बालिश ढोंग करू नका,
— Diptesh (@Diptesh1258) January 18, 2023
स्वप्निलचा वाळवी हा चित्रपट 13 जानेवारी 2023 रोजी रिलीज झाला. या चित्रपटात स्वप्नील जोशी बरोबरच सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: