Sushmita Sen: सुष्मिता सेन साकारणार गौरी सावंत यांची भूमिका; शेअर केला 'ताली' मधील लूक
सुष्मिताच्या (Sushmita Sen) लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
Sushmita Sen: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी (Lalit Modi) आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन यांच्या डेटिंगची चर्चा सोशल मीडियावर सुरु होती. त्यामुळे सुष्मिता सेन चर्चेत होती. आता सध्या सुष्मिता देखील प्रकाशझोतात आली आहे. एका आगामी चित्रपटातील सुष्मिताचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. या सुष्मिताच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
ट्रान्सजेंडरची भूमिका सुष्मिता
सुष्मिता सेननं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये सुष्मितानं तिच्या आगामी चित्रपटामधील लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला सुष्मितानं कॅप्शन दिलं, 'ताली- बजाऊँगी नहीं, बजवाऊँगी! ' साडी, लाल टिंकली, हातात खड्याळ अन् गळ्यात माळ अशा लूकमधील फोटो सुष्मितानं शेअर केले.
सुष्मिताची पोस्ट :
View this post on Instagram
गौरी सावंत कोण आहेत?
गौरी सावंत या अॅक्टिविस्ट आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित जिवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या जिवनपटामध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. गौरी सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. त्या समाजसेविका आहेत. गौरी या महिला आणि अनाथ मुलांसाठी काम करतात. कौन बनेगा करोडपतीच्या 9 व्या सिझनमध्ये देखील गौरी यांनी हजेरी लावली होती.
सुष्मिता सेनच्या करिअरमध्ये 'आर्या' वेबसीरिजचा महत्त्वाचा वाटा आहे. या सीरिजचा तिसरा सीझन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुष्मिताच्या आगामी चित्रपटांची आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: