Aarya Season 3 : बहुचर्चित 'आर्या'चा तिसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी केली घोषणा
Sushmita Sen Aarya Season 3 : 'आर्या' या बहुचर्चित वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Web Series Aarya Season 3 : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनच्या बहुचर्चित 'आर्या' (Aarya) या वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. लेडी डॉनच्या भूमिकेत पुन्हा एकदा सुष्मिता सेन दिसणार आहे.
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार 'आर्या 3'
गेल्या दोन वर्षांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुष्मिता सेनच्या 'आर्या'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. 2020 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'आर्या' वेबसीरिजची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. 'आर्या' वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे प्रेक्षक या सीरिजच्या तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत होते. दरम्यान डिज्नी प्लस हॉटस्टारवर निर्मात्यांनी आर्याच्या तिसऱ्या सीझनची घोषणा केली आहे. राम माधवानी या सीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत.
View this post on Instagram
सुष्मिता सेनच्या करिअरमध्ये 'आर्या' वेबसीरिजचा महत्त्वाचा वाटा आहे. सुष्मिता सेनने 'आर्या 3' संदर्भात पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"नव्या प्रवासासाठी मी सज्ज आहे". 2020 मध्ये आलेल्या आर्याच्या पहिल्या सीझनपासून सुष्मिता सेनच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकंली होती. दुसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता लेडी डॉनच्या भूमिकेत दिसून आली. पण आर्याच्या तिसऱ्या सीझनमध्ये सुष्मिता मुलांच्या हक्कांसाठी लढताना दिसून येणार आहे. प्रेक्षक या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या