एक्स्प्लोर
सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना सोडवा, अक्षयचं ट्वीट
नवी दिल्लीः दक्षिण सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी विनंती बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना केली. सुषमा स्वराज यांनी देखील अक्षय कुमारला तातडीने उत्तर दिलं. सुदानमध्ये सध्या सरकार आणि विरोधी पक्षातील तणावामुळे हिंसा वाढली आहे.
अक्षय कुमार आपल्या देशभक्तीपर भूमिकांसाठी ओळखला जातो. 'एअरलिफ्ट' सिनेमात अक्षय कुमारने भारतीय उद्योजक रंजीत कातियालची भूमिका साकारली होती. 'एअरलिफ्ट'मधील रंजीत कातियाल कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यात महत्वाची भूमिका निभावतो.
https://twitter.com/akshaykumar/status/752790202423312384
परराष्ट्र मंत्र्यांचं लगेच उत्तर
अक्षय कुमारने ट्विटरवरुन परराष्ट्रमंत्र्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी देखील लगेच दखल घेतली. अक्षयजी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे, अशा शब्दात अक्षय कुमारला सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं.
अक्षय कुमारचा 'रुस्तम' सिनेमा सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या सिनेमात अक्षयने नौदल अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. यापूर्वीही 'हॉलिडे' या सिनेमातून दहशतवादाविरोधातील अभिनेत्याची भूमिका साकारली होती.
https://twitter.com/SushmaSwaraj/status/752834400585453568
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement